श्रीलंकेनं रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध सलग 11 द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा सिलसिला संपुष्टात आला. श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटचा मालिका विजय डिसेंबर 1997 मध्ये मिळवला होता. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतानं फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक विकेट्स गमावण्याचा रेकॉर्डही केला आहे.
फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर भारतासमोर विजयासाठी 241 धावांचं लक्ष्य होतं. मात्र हे लक्ष्य भारतासाठी खूप मोठं ठरलं. टीम इंडिया 42.2 षटकांत 208 धावांत गारद झाली. श्रीलंकेकडून फिरकीपटू वेंडरसेनं 33 धावांत 6 बळी घेतले, तर कर्णधार चरिथ असलंकानं 20 धावांत 3 विकेट घेतल्या. अशाप्रकारे श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारताचे 10 पैकी 9 गडी बाद केले.
भारतानं एकदिवसीय सामन्यात फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक विकेट श्रीलंकेविरुद्धच गमावल्या आहेत. 2023 मध्ये श्रीलंकेच्या फिरकीपटूंना भारतीय संघाच्या सर्व विकेट घेतल्या होत्या. त्यापूर्वी 1997 मध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवरच भारतानं श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध 9 विकेट्स गमावल्या होत्या. 2011 नंतर ही पाचवी वेळ आहे, जेव्हा विरोधी संघानं भारताविरुद्ध 250 पेक्षा कमी धावांचा बचाव केला आहे. श्रीलंकेनं ही कामगिरी करण्याची पहिलीच वेळ आहे.
एकदिवसीय सामन्यात भारतानं फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक विकेट गमावल्या
10 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023
9 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 1997
9 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो 2024 (मालिकेतील पहिला सामना)*
9 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2024 (मालिकेतील दुसरा सामना)*
2011 पासून (वनडे) भारताविरुद्ध 250 पेक्षा कमी धावांचा बचाव
190, वेस्ट इंडीज, नॉर्थ साउंड, 2017
240, न्यूझीलंड, मँचेस्टर, 2019
241, श्रीलंका, कोलंबो 2024*
243, न्यूझीलंड, दिल्ली 2016
247, इंग्लंड, लॉर्ड्स, 2022
हेही वाचा –
यामुळे झाला पराभव, भारताच्या श्रीलंकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवामागची 3 प्रमुख कारणं
IND vs SL निर्णायक सामन्यात भारताचा पराभव, श्रीलंकेचा 32 धावांनी शानदार विजय
विराट बाद होता की नाबाद? डीआरएसवरून मोठा गोंधळ, श्रीलंकन खेळाडूंच्या प्रतिक्रियेनेही वेधले लक्ष