जानेवारी महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी भारताकडून 10 बॉल बॉइज आणि गर्ल्सचा संघ सहभागी होणार आहे. यामध्ये 4 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे.
डेविस कपमधील भारतीय संघाचा कर्णधार महेश भुपतीने या निवड प्रक्रियेत महत्त्वाची भुमिका बजावली. भुपती त्या बॉल बॉइज आणि गर्ल्सना सरावही देणार आहे.
किया मोटर्सच्या सहाय्याने भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे झालेल्या विविध प्रकारच्या खेळांमधून आणि बोलण्याच्या शैलीच्या आधारे अंतिम 100 मुला-मुलींची निवड करण्यात आली. तर त्याच्यांमधून अंतिम 10 जणांची निवड करण्यात आली.
किया मोटर्स हे जगातील आठव्या क्रमांकाची चारचाकी गाड्या बनवणारी कंपनी आहे. त्यांचे ऑस्ट्रेलियन ओपन सोबत काही वर्षापासून भारीदारीही आहे. तसेच त्यांनी किया ऑस्ट्रेलियन ओपन बॉलकिड नावाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला. ज्यामुळे अनेक देशांतील मुलां-मुलींना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बॉल बॉइज आणि गर्ल्स म्हणून सहभाग घेता येईल. यामध्ये भारतातील मुलां-मुलींसाठी अधिक जागा दिल्या आहेत.
भारतात प्रथमच बॉल बॉइज आणि गर्ल्ससाठी अशाप्रकाराची निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये अनेक शहरांमधून तब्बल 2000 जण सहभागी झाले होते.
“हा कार्यक्रम भारतातील नवोदीत टेनिसपटूंसाठी अप्रतिम आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया ओपन या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा हा उत्तम मार्ग आहे”, असे भुपती म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरे, सेरेना विल्यम्स करणार पुनरागमन
–Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला
–हॉकी विश्वचषक २०१८: विश्वचषकातील पहिला गोल करण्यासाठी मलेशिया-पाकिस्तान सज्ज