---Advertisement---

INDvsSL: भविष्यासाठी ऍक्शन सुरू; पूर्वसूचना देत रहाणे, पुजारासह ४ सीनियर्सची कसोटी संघातून सुट्टी

On: शनिवार, फेब्रुवारी 19, 2022 7:49 PM
Cheteshwar Pujara-and-Ajinkya-Rahane
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानांवर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची (Sri Lanka Tour Of India) आहे. या मालिकेसाठी शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना जागा दिली गेली नाही. हे दोन्ही फलंदाज गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहेत.

पुजारा आणि रहाणेबरोबरच इशांत शर्मा (Ishant Sharma) व यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) यांनाही जागा दिली गेलेली नाही. 

भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी कसोटी संघाची घोषणा करताना या वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्यामागचे कारणही सांगितले आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) म्हणाले की, “भारतीय संघाने अधिकृतपणे बदलांच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भारताच्या कसोटी संघात रहाणे, पुजारा, इशांत आणि साहा नाहीत. आता त्यांच्याजागी हनुमा विहारी, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्याची वेळ आली आहे.”

“आम्ही रहाणे, पुजारा, इशांतला रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले आहे. त्यातही रहाणे आणि पुजाराला तर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, सध्या कसोटी सामन्यांसाठी त्यांच्या नावांचा विचार केला जाणार नाही. आम्ही कोणासाठी संघाची दारे बंद केलेली नाहीत. खेळाडूंनी धावा कराव्यात, विकेट्स घ्याव्यात आणि मग देशासाठी खेळावे. मला अपेक्षा आहे की, ते जबरदस्त पुनरागमन करतील,” असे निवड समितीचे अध्यक्ष पुढे म्हणाले.

हेही वाचा- मोठी बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, बुमराहची उपकर्णधारपदी निवड

उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर रहाणे संघातून बाहेर
गेले १२ महिने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज रहाणेसाठी आव्हानात्मक राहिली आहेत. वर्ष २०२१ मध्ये ३३ वर्षीय रहाणेने १३ कसोटी सामने खेळताना निराशाजनक २०.८३ च्या सरासरीने ४७९ धावा केल्या आहेत. या धावा त्याच्या लौकिकास साजेशा नाहीत. परिणामी त्याला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर आता जवळपास कसोटी संघातूनही त्याची सुट्टी झाली आहे.

पुजाराच्या फॉर्ममध्ये बिघाड
वर्ष २०२१ मध्ये भारताची नवी द वॉल म्हणला जाणारा पुजाराही संघर्ष करताना दिसला आहे. त्याने गतवर्षी १४ कसोटी सामन्यांमध्ये २८.०८ च्या सरासरीने ७०२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ६ अर्धशतके नक्कीच ठोकली आहेत. परंतु त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसू आले नाही. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही यादरम्यान चांगला न राहिल्याने त्याला टीकांचा सामना करावा लागला.

याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज इशांतचाही फॉर्म जास्त चांगला राहिला नसून तो सतत फिटनेसच्या समस्यांतून जात आहे. तर साहाच्या वाढत्या वयाला पाहता बीसीसीआय यष्टीरक्षक केएस भरतला संधी देण्यास प्राधान्य देते आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsSL: राहुलच्या जागी बुमराहची उपकर्णधारपदी निवड, ‘या’ कारणामुळे वेगवान गोलंदाजाला मिळालीय जबाबदारी

‘त्याने माझं टेंशन कमी केले’, अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटचं कर्णधार रोहितकडून तोंडभरून कौतुक

रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---