दुबई | दुबई येथे शुक्रवार दि. 22 जूनपासून सुरू झालेल्या पहिल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
शुक्रवार दि. 22 जूनला ‘अल वस्ल स्पोर्ट्स कॉप्लेक्स’ येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कर्णधार अजय ठाकूरच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा 36-20 असा पराभव केला.
सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटात सावध खेळ करणाऱ्या भारतीय संघाने नंतर आक्रमक खेळ करत पहिल्या हाफमध्ये तब्बल 13 गुणांची आघाडी घेतली.
पहिला हाफ झाला तेव्हा भारत 22-9 अशा फरकाने आघाडीवर होता. त्यानंतर भारतीय संघाला रोखने पाकिस्तानला अवघड गेले.
दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने पहिल्या हाफमधील 22 गुणांमध्ये दुसऱ्या हाफमध्ये 14 गुणांची भर घालत 36 अशी गुणसंख्या केली. तर पाकिस्तानला संपूर्ण सामन्यात वीसच गुण मिळवता आले. भारताच्या १५ रेडिंग गुणातील ८ एकट्या अजय ठाकूरचे होते.
हा सामना भारतीय संघांचे या खेळातील वर्चस्व दाखवणारा होता. पाकिस्तान हा तगडा संघ असूनही भारताने पाकिस्तनला कोणतीही संधी दिली नाही.
भारताकडे अजय ठाकूर, परदीप नरवाल, राहुल चौधरी सारखे स्टार रेडर होते परंतु कर्णधार अजय ठाकूरचा खेळ हा सर्वात उजवा ठरला. त्याला रोहीत कुमारने चांगली साथ दिली.
मुसादर अली हा पाकिक्तानकडून सर्वाधिक गुण घेणारा खेळाडू ठरला. त्याने रेडिंगमध्ये ६ गुण घेतले.
या सामन्यासाठी भारताचे क्रिडा राज्य मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड उपस्थीत होते. त्याच्या हस्ते या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण झाले.
तसेच सामन्याच्या टॉसवेळी अभिनेता आणि प्रो-कबड्डी लीगमधील जयपूर पिंक पॅन्थर्स संघाचा मालक अभिषेक बच्चनही उपस्थित होता. अभिषेक बच्चनने या सामन्या दरम्यान समालोचनदेखील केले.
भारताचा पुढचा सामना शनिवार दि. 23 जून म्हणजेच आज रात्री 9 वाजता केनिया विरुद्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-क्रिकेट विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटानां प्रचंड मागणी
–आयसीसीचे सीईओ देणार २०१८ एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट व्याख्यान