---Advertisement---

तब्बल २१वर्षानंतर भारत-चीन खेळणार फुटबॉल सामना

---Advertisement---

दिल्ली।  भारतीय वरिष्ट फुटबॉल संघ ऑक्टोबर, 2018मध्ये चीन विरुद्ध ऐतिहासिक मैत्रीपुर्ण सामना खेळणार आहे. फिफाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना होणार आहे असे स्पष्टीकरण ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने(एआयएफएफ) दिले आहे.

फिफाच्या क्रमवारीत भारत 97व्या तर चीन 75व्या क्रमांकावर आहेत. बीजिंगमध्ये होणारा हा सामना 8-16 ऑक्टोबर, 2018 यातील कोणत्याही एका तारखेला होणार आहे.

एआयएफएफने 13 ऑक्टोबर ही तारीख सुचवली असून यात पुढे बदल होऊ शकतो.

भारत आणि चीन 17 वेळा समोरा-समोर आले आहेत. यातील 12 सामने चीनने जिंकले तर 5 सामने अनिर्णीत राहिले.

हे सगळे सामने भारतातच झाले होते.  तब्बल 21वर्षानंतर हे दोन संघ आमने-सामने येत आहे. याआधी 1997च्या नेहरू चषकात ते शेवटचे एकमेकांविरुद्ध खेळले होते.

आताच 16वर्षांखालील भारतीय संघ चीनमधील चार देशांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत खेळला आहे.

ऑक्टोबरमध्ये होणारा हा सामना 2019च्या एशियन कपसाठी खूप महत्त्वाचा आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या या एशियन कप स्पर्धेला 2019मध्ये जानेवारी महिन्यात सुरूवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिस्टियानो रोनाल्डोने दिली तब्बल १६ लाखांची टिप

एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment