भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 12 नोव्हेंबरला सिडनी येथे रवाना होणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ सिडनीला पोहचल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहाणार आहे. असे असले तरी भारतीय संघाला क्वारंटाईन कालावधीदरम्यान सराव करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र यासाठी सिडनीत पोहोचताच भारतीय संघांची कोरोना चाचणी होणार असून रिपोर्ट निगेटिव्ह आल्या नंतरच सराव करायला मिळणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला पोहचेल. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी होईल. यानंतर सर्व खेळाडू 13 नोव्हेंबरपासून सिडनी येथे सरावाला सुरुवात करतील.
भारतीय संघ युएईमधून ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यामुळे सध्या युएईमध्ये भारतीय संघासाठी वेगळा बायोबबल झोन तयार करण्यात आला आहे. त्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीसह मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल, रविंद्र जडेजा असे भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सराव करत आहेत.
या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने होईल. त्यानंतर 3 सामन्यांची टी20 मालिका होईल आणि शेवटी कसोटी मालिका होणार आहे. कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेडला होणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला शिखर धवन; नावावर केले ३ खास विक्रम
महिला आयपीएल फायनल : सुपरनोवाज हॅट्रिक साधणार की ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
…तर रोहित जाणार नाही ऑस्ट्रेलियाला; विराटही ३ कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता