भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी२० व कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. काही खेळाडूंनी ऊँची तफ़री दुबईमधील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सुरुही केली आहे. परंतू बीसीसीआय निवड समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीनुसार या मालिकेतून काही खेळाडूंना दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. तर काही खेळाडू जर दुखापतमधून सावरले तर त्यांचा संघात समावेश करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या दौऱ्यात नाव न आल्याने सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ३ वनडे सामन्यांची मालिका २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ३ टी२० सामन्यांची मालिका ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. तर ४कसोटी सामन्यांची मालिका १७ डिसेंबर ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहे. रोहितला दुखापतीमधून सावरण्यासाठी वनडे व टी२० मालिकेत घेण्यात आले नाही.
१. रोहित शर्मा- बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “बीसीसीआयची मेडिकल टीम रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्याच्या दुखापतीबद्दल भारतीय क्रिकेटच्या निवड समितीला याची माहिती दिली आहे. त्यामुळे रोहितला वनडे व टी२० मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात तो आपल्या फीटनेसवर काम करेल. तसेच त्याचा भारतीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे.”
२. विराट कोहली- २६ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत विराट कोहलीने ऍडलेडमधील पहिल्या कसोटीनंतर भारतात परत जाण्याच्या आपल्या योजनेबद्दल बीसीसीआयला माहिती दिली होती. बीसीसीआयने भारतीय कर्णधाराला पितृत्व रजा दिली आहे. ऍडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर तो भारतात परतेल.
३. संजू सॅमसन- संजू सॅमसनची भारतीय वनडे संघात एक अतिरीक्त यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
४. इशांत शर्मा- राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये इशांत शर्मा फिटनेसवर काम करते आहे. तो दुखापतीमधून पुर्ण सावरल्यावर त्याचा भारतीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर समावेश करण्यात येणार आहे.
५. वरुण चक्रवर्ती- खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टी नटराजनला संधी देण्यात आली आहे.
६. वृद्धीमान साहा- यष्टीरक्षक वृद्धीमान साहाला देखील दुखापत झाली असून हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे तो खेळणार की नाही याबद्दल नंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्याला ३ नोव्हेंबरला आयपीएल सामन्यात दुखापत झाली होती.
७. कमलेश नागरकोटी- कमलेश नागरकोटी हा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नसून तो बीसीसीआयच्या मेडिकल टीमसोबत गोलंदाजीच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करणार आहे.