संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या बहुप्रतिक्षित दौऱ्यासाठी भारतीय संघाचा चायनामॅन कुलदीप यादवला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, टी२० संघातून त्याला डच्चू मिळाला आहे. अशात खास आकडेवारी नसूनही कुलदीपला वनडेत स्थान देण्यामागे नक्की काय कारण आहे? याची चर्चा रंगू लागली आहे.
मागील न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील कुलदीपच्या प्रदर्शनामुळे त्याची भारतीय वनडे संघात निवड झाली. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळेही निवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला, असे म्हटले जात आहे.
वनडे विश्वचषकात अत्यंत खराब प्रदर्शन
२०१९ सालच्या वनडे विश्वचषकात कुलदीपने अत्यंत खराब गोलंदाजी केली होती. विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात त्याने १० षटकात ७२ धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान त्याने जेसन रॉयची एकमेव विकेट घेतली होती. त्यामुळे भारताने तो सामना ३१ धावांनी गमावला होता. त्यानंतर त्याला जास्त संधी देण्यात आल्या नाहीत.
वेळेनुसार प्रदर्शनात बिघाड
इंग्लंडविरुद्धच्या खराब प्रदर्शनापुर्वीची कुलदीपची आकडेवारी उल्लेखनीय होती. जून २०१७मध्ये वनडेत पदार्पण केलेल्या कुलदीपने जून २०१९पर्यंत भारतीय संघाकडून एकूण ४९ सामने खेळले होते. त्यात त्याने २३.०६च्या सरासरीने ९१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याचा इकोनॉमी रेट ४.८८ इतका होता.
मात्र या कालावधीनंतर कुलदीपच्या प्रदर्शनात बिघाड होत गेले. जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याने एकूण १० वनडे सामने खेळले. त्यात त्याने ४५.८३च्या सरासरीने फक्त १२ विकेट्स घेतल्या. यात हॅमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्धच्या त्याच्या शेवटच्या वनडे सामन्यातील आकडेवारीचा समावेश आहे. त्या सामन्यात त्याने १० षटाकत ८४ धावांवर २ विकेट्स घेतल्या होत्या.
एवढेच नव्हे त्यापुर्वीच्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याचे प्रदर्शन खास राहिले नव्हते. तरीही त्याला येत्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत स्थान मिळण्यामागचे कारण हे संघातील रिस्ट स्पिनर्सची कमतरता हे असावे.
स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी
ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर रिस्ट स्पिनर्सला (मनगटाचा वापर करणारे फिरकीपटू) खूप मदत मिळू शकते. कुलदीपलाही त्याच्या रिस्ट स्पिनिंग गोलंदाजीसाठी ओखळले जाते. अशात जर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय वनडे संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले. तर त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तो फ्लॉप ठरला. तर त्याला पुन्हा भारतीय वनडे संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ