उद्यापासून (6 डिसेंबर) अॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून यामधील शेवटचा सामना 3 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.
भारतीय संघाची ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची आॅस्ट्रेलियन भूमीतील 12वी कसोटी मालिका असून आधी झालेल्या 11 मालिकांपैकी ऑस्ट्रेलियाने 8 मालिका जिंकल्या आहेत. तर यामधील 3 मालिका अनिर्णीत राहिल्या. या मालिकेमधील 44 सामन्यात भारताला फक्त 5 सामने जिंकता आले आहेत.
असा आहे भारताचा आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकांचा इतिहास-
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1948-49): 4-0
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 1948ला पहिली कसोटी मालिका खेळली गेली. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ही मालिका 4-0 अशी गमवावी लागली होती. यावेळी अॅडलेड येथील कसोटी सामन्यात भारताकडून विजय हजारे यांनी 116 आणि 145 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1967-68): 4-0
दुसरी कसोटी मालिका तब्बल 20 वर्षानंतर खेळली गेली. 1967च्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ पतौडी यांच्या नेतृत्वाखाली खेळत होता. ही मालिका भारताने 4-0 अशी गमावली होती.
त्यानंतर 10 वर्षांनी 1977ला खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी मालिकेत भारत 3-2 असा मागे राहिला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1980-81): 1-1
1980-81च्या या चौथ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखाली खेळला. यामध्ये कपिल देव आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी चमकदार कामगिरी केल्याने पहिल्यांदाच भारताला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला 1-1 असे रोखता आले. त्या जिंकलेल्या सामन्यात देवने 28 धावाच 5 विकेट घेतल्या होत्या. हा सामना भारताने 59 धावंनी जिंकला होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1985-86): 0-0
1883चा वन-डे विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला1985च्या कसोटी मालिकेतही 0-0 असे रोखले. या मालिकेत फलंदाजांचेच वर्चस्व राहिले. या मालिकेतील अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार कपिल देवने 106 धावांवर 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने अॅलन बॉर्डरला 49 धावावर बाद केले होते. यावेळी 99 धावावर 3 विकेट घेणाऱ्या देवने पुढील पाच विकेट्स फक्त सात धावा देत घेतल्या. या सामन्यात सुनिल गावसकरने पहिल्या डावात नाबाद 166 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1987-88): 4-0
1987चे विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाने अॅलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-0 असे पराभूत केले. भारतीय संघ मोहमद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळला. या मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांनी सळो की पळो करून सोडले होते. यातील चौथ्या कसोटी सामन्यात अझरूद्दीनने 106 धावांची शतकी खेळी केली होती. पण तो सामन्यात भारताला 38 धावांनी पराभूत व्हावे लागले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1999-00): 3-0
सचिन तेेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाला 1999च्या कसोटी मालिकेत 3-0 असे पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली या दोघांनी भारतीय फलंदाजांना पिचवर अधिक काळ टिकू दिले नाही. अॅडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात मॅकग्राने 35 धावा देत 3 विकेट्स घेत हा सामना ऑस्ट्रेलियाने 285 धावांनी जिंकला. तर तिसऱ्या कसोटीत ब्रेट लीने 39 धावा देत 4 विकेट्स आणि मॅकग्राने 48 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2003-04): 1-1
ही मालिका ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह वॉची त्यांच्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी मालिका होती. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी अप्रतिम खेळ करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार राहुल द्रविडने 233 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या कसोटीत विरेंद्र सेहवागने 195 धावा केल्या. या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या तेंडुलकरने चौथ्या सामन्यात 241 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2007-08): 2-1
भारतीय संघ कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला. भारताने पहिला सामना 337 धावांनी गमावत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर चौथा सामना अनिर्णीत राहिला. या मालिकेत सचिनने सर्वाधिक 493 धावा केल्या. मात्र ही मालिका ‘मंकीगेट’ प्रकरणाने चांगलीच गाजली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2011-12): 4-0
28 वर्षानंतर दुसरा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली या मालिकेत ढिसाळ कामगिरी झाली. यातील पहिला सामना 122 धावांनी, दुसरा सामना एक डाव आणि 68 धावा, तिसरा सामना एक डाव आणि 37 धावा आणि चौथा सामना 298 धावांनी गमावल्याने धोनीच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्हही उमटले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2014-15): 2-0
या मालिकेत धोनीने तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती घेतल्याने भारताने चौथा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. फलंदाजीत भारताकडून कोहलीच चमकला. त्याने या मालिकेत चार शतके केली. पहिला आणि दुसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या:
–अंदाज दिग्गजांचे: कोण जिंकणार भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका?
–आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने
–२०११ च्या विश्वचषकातील फक्त हे दोन खेळाडू सध्या टीम इंडियाकडून खेळत आहेत वनडे क्रिकेट