नेपीयर | टीम इंडियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पुढील दौरा न्यूझीलंड देशाचा आहे. या दौऱ्यात कर्णधार कोहलीची टीम इंडिया ५ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात नेपीयर वनडेने २३ जानेवारी रोजी होणार आहे. तर वेलिंग्टनला ५वा वनडे सामना ३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
टी२० मालिकेला ६ फेब्रुवारी रोजी वेलिंग्टनला होणाऱ्या सामन्याने सुरुवात होणार आहे. तर या दौऱ्याचा शेवटचा सामना हॅमिल्टनला १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाची यापुर्वीच घोषणा झाली असून या दौऱ्यात वनडे तसेच टी२० मालिकेत युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
या दोन्ही मालिकांमधून अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच सलामीवीर केएल राहुला वगळले आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ याही दौऱ्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
याबरोबरच पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी १४ जणांच्या न्यूझीलंड संघाचीही घोषणा झाली आहे. या वनडे संघात अष्टपैलू मिशेल सॅन्टेनरचे पुनरागमन झाले आहे. तो २०१८ मध्ये गुडघा दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता.
त्याचबरोबर टॉम लॅथम आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांचाही न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. त्यांना श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
असा आहे भारताचा न्यूझीलंड दौरा-
वनडे मालिका-
पहिला वनडे सामना- नेपीयर- २३ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
दुसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- २६ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
तिसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- २८ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
चौथा वनडे सामना- हॅमिल्टन- ३१ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
पाचवा वनडे सामना- वेलिग्टंन- ०३ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वाजता
टी२० मालिका-
पहिला टी२० सामना- वेलिग्टंन- ०६ फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता
दुसरा टी२० सामना- ऑकलंड- ०८ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता
तिसरा टी२० सामना- हॅमिल्टन- १० फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), विजय शंकर, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, शुभमन गिल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिदार्थ कौल, खलील अहमद.
पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी असा आहे न्यूझीलंड संघ –
केन विलियमसन(कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डो ब्रासवेल, कॉलीन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, हेन्री निकोलास, मिशेल सॅन्टेनर, इश सोधी, टिम साऊथी, रॉस टेलर.
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले
–ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेप्रमाणेच वनडेतही टिम इंडियाने रचला इतिहास






