---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 अन् वनडे मालिकेसाठी दोन संघांची निवड, दोन महत्त्वाच्या खेळाडूंना डच्चू

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 7:15 PM
Virat-Kohli-And-Rohit-Sharma
---Advertisement---

सध्या टी20 विश्वचषक 2022चा महाकुंभमेळा सुरू असतानाच भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी एक नाही दोन नाही, तर तब्बल 4 भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यातून भारताच्या ताफ्यात दोन महत्त्वाच्या खेळाडूंना वगळले आहे. कोण आहेत ते खेळाडू चला जाणून घेऊया…

बीसीसीआयने (BCCI) सोमवारी (दि. 31 ऑक्टोबर) ट्वीट करत बांगलादेश आणि न्यूझीलंड (India Tour of Bangladesh And New Zealand) दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केले. भारताला 4 ते 22 डिसेंबरदरम्यान बांगलादेशविरुद्ध 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. यासाठीच्या दोन्ही संघांमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा समावेश आहे. तसेच, भारताला 18 ते 30 नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. न्यूझीलंडच्या दौऱ्यातून रोहित आणि विराट या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी विश्रांती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या दिनेश कार्तिक याला या दोन्ही दौऱ्यात संधी मिळालेली नाहीये.

विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे, तर वनडे मालिकेत शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी आहे. तसेच, बांगलादेशविरुद्धच्या वनडे आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---