सध्या आयपीएलच्या धामधुमीत एकीकडे महिला क्रिकेट खेळाडूंसाठीची विशेष अशी महिला टी२० चॅलेंज स्पर्धा रंगत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी सुपरनोव्हाज विरुद्ध व्हेलोसिटी या दोन संघांमध्ये खेळला जाईल. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून भारतीय महिला संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा केली आहे. जूनमध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे.
भारताच्या महिलांच्या श्रीलंका दौऱ्याला मान्यता देणे हा श्रीलंका क्रिकेट कार्यकारी समितीने घेतलेल्या सात निर्णयांपैकी एक निर्णय आहे. सध्या भारतीय महिला खेळाडू पुण्यात सुरू असलेल्या महिला टी२० चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. तर श्रीलंका महिला संघ पाकिस्तानचा दौरा करत आहे.
भारताने शेवटच्या वेळी श्रीलंकेचा दौरा २०१८ साली केला होता, जिथे भारताने एकदिवसीय मालिका २-१ आणि टी२० मालिका ४-० ने जिंकली होती. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरल्यानंतर ही भारताची पहिली द्विपक्षीय मालिका असेल.
दरम्यान, श्रीलंका मालिकेनंतर, जुलै-ऑगस्टमध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसह भारताचा गट केला जाणार आहे. यानंतर १० ते २४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडसोबत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जातील.
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार
चहलला खुणावतायेत मोठे विक्रम! बेंगलोरविरुद्ध कमाल करत मलिंगा, बुमराहलाही ठरू शकतो वरचढ