---Advertisement---

झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, पण यांची निवड चकित करणारी

On: शनिवार, जुलै 30, 2022 8:41 PM
wi v ind odi
---Advertisement---

झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची आज (शनिवार, ३० जुलै) घोषणा करण्यात आली आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेत दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे संघपुनरागमन झाले आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यावर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट बोर्डने नेतृत्वाची जबाबदारी देत विश्वास दाखवला आहे. तसेच या मालिकेत सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) यालाही विश्रांती देण्यात आली आहे. तर राहुल त्रिपाठीला संघात जागा देण्यात आली आहे. त्याला या मालिकेतील सामन्यात अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली तर त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरणार आहे.

भारतीय संघात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि इशान किशन या दोन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली आहे. तर ऋतूराज गायकवाडने पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे.

पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या वनडे मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना २० ऑगस्ट आणि तिसरा सामना २२ ऑगस्टला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने हरारेच्या स्पोर्ट्स क्लब या स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ-

शिखर धवन (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

 

भारताने नुकतेच वेस्ट इंडिज दौऱ्यात धवनच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका जिंकली आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंंडिजला ३-० असे पराभूत केले होते. त्याआधी भारताने इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा होणार ‘दादागिरी’, कसं ते घ्या जाणून

CWG 2022: टपरी चालवणाऱ्या बापाचे कष्ट फळले! २१व्या वर्षी मुलाने भारताला मिळवून दिलं पदक

‘द्रविडच्या विचारांचा संघाला फायदा नाही’, महत्त्वाच्या खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे भडकला माजी दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---