भारताचा 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघ मागच्या काही दिवसांपासून यूएईमध्ये आहे. 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धा दुबईमध्ये खेळली जात आहे. शुक्रवारी (15 डिसेंबर) या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर खेळला गेला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्यात बांगलादेशने 4 विकेट्स राखून भारताला पराभवाची धूळ चारली.
बांगलादेश संघाला विजयासाठी या सामन्यात भारताकडून 189 धावांचे आव्हान मिळाले होते. 50 षटकांच्या सामन्याचा विचार करता हे लक्ष्य बांगलादेशसाठी नक्कीच मोठे नव्हते. चौथ्या क्रमांकावर खेळताना अरिफ इस्लान याने 94 धावांची सुरेख खेळी केली, जी बांगलादेशच्या विजयासाठी सर्वात महत्वाची ठरली. पाचव्या क्रमांकावर अहरार अमीन यानेही 44 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी भारतीय संघ 50 षटकांच्या या सामन्यात अवघ्या 42.4 षटके खेळल्यानंतर सर्वबाद झाला. भारताने 188 धावांपर्यंत कशीबशी मजल मारली होती. मुरूगन अभिषेक (62) आणि मुशीर खान (50) यांच्या अर्धशतकांमुळे भारताला ही धावसंख्या गाढता आली. संघातील दुसरा एकही फलंदाज 20 धावांची खेळीही करू शकला नाही. दोन फलंदाज शुन्यावर, तर चार फलंदाजांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावली.
Bangladesh-U19 clinches victory by 4 wickets against India-U19, securing a thrilling ticket to the finals. The cricketing arena buzzes with excitement as Bangladesh charts their course to championship glory. #ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/OBYEu5MbxP
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 15, 2023
उपांत्या सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर बांगलादेशने अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि यूएईमध्ये खेळला गेला होता. पाकिस्तानने या सामन्यात 11 धावांनी पराभव स्वीकारल्यामुळे अंतिम सामन्यात यूएईचे स्थान आधीच पक्के झाले होते. 19 वर्षांखाली बांगलादेश विरुद्ध यूएई असा अंतिम सामना रविवारी (17 डिसेंबर) रंगणार आहे. (India U19 faced an upset in the semi-finals of ACC Men’s U19 Asia Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
‘मॅक्सवेल कसोटी क्रिकेटसाठी योग्य नाही’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या विधानाने माजली खळबळ
बीसीसीआय सुरू करणार आयपीएलसारखी दुसरी लीग, पहा नक्की कसा असेल हा नवा फॉर्मेट