भारताचा सलीमीवीर फलंदाज शिखर धवन नुकताच चांगल्या लयीत परतला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी करत मालिकावीरचा पुरस्कारही पटकावला.
मात्र त्याला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने तो टी20 मालिकेआधी निराश असल्याचा खुलासा त्याने केला आहे. त्याबद्दल तो म्हणाला, ‘हो, मी थोडा नाराज होतो. पण मी आता सावरलो आहे आणि आत्ता मी चांगल्या मनस्थितीत आहे.’
‘मला काही वेळ मिळाला आहे. त्यामुळे आता मी माझ्या ट्रेनिंगची मजा घेणार आहे आणि मला फिट ठेवणार आहे. मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा गोष्टी माझ्यासाठी चांगल्या घडतात.’
त्याचबरोबर शिखर धवनने 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरु होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत आॅस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी करेल असाही विश्वास व्यक्त केला आहे.
तो म्हणाला, ‘मला वाटते आम्हाला कसोटी मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. आम्हाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच सातत्य राखावे लागेल. त्यानंतर आपल्याला जिंकण्याती खूप चांगली संधी आहे.’
त्याचबरोबर पुढीलवर्षी होणाऱ्या विश्वचषकाबद्दल धवन म्हणाला, तो त्याचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. तसेच विश्वचषक पुन्हा भारतात आणण्यासाठीही प्रयत्न करेल.
हा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील अनुभव मदत करेल असेही मत शिखरने व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पावसामुळे वाया गेलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी कर्णधार कोहलीची नवी युक्ती
–पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय
–मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर
–ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस