---Advertisement---

भारत- ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याबद्दल सर्वकाही; वाचा

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 7:20 AM
---Advertisement---

ऍडलेड। विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ गुरुवारी (१७ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यास उतरणार आहे. दोन्हीही संघातील हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताकडून पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करतील, तर वृद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून ताफ्यात सामील केले आहे.

विराटसाठी हा सामना खूपच खास असेल. कारण या सामन्यानंतर तो आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे. त्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे उर्वरित ३ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्त्व करणार आहे.

विशेष म्हणजे या प्लेईंग इलेव्हनमध्ये शुबमन गिल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंना संधी दिलेली नाही.

केव्हा होणार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (१७ डिसेंबर) खेळवण्यात येणार आहे.

कुठे होणार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना ऍडलेड ओव्हल येथे होणार आहे.

किती वाजता सुरू होणार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल.

कुठे पाहता येईल भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रसारण आणि स्ट्रिमिंग?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रसारण सोनी नेटवर्कवरून होणार आहे, तर लाईव्ह स्ट्रिमिंग हे सोनी लिववर पाहता येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या-

“विराटच्या अनुपस्थितीत रहाणे…”, सचिन तेंडुलकरचे महत्वपूर्ण विधान

आम्ही ‘त्यांचा’ सामना करण्यास उत्सुक, कर्णधार कोहलीकडून मुख्य प्रतिस्पर्ध्यांचा नावानिशी उल्लेख

कोहली-स्मिथ दरम्यान रंगला प्रश्नोत्तरांचा खेळ; विराटने दिली दिलखुलास उत्तरे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---