भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना ऍडलेड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही संघांनी आपापल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली होती, तर ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यापूर्वी आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
यामध्ये भारताकडून पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल यांना सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले आहे, तर वृद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून ताफ्यात सामील केले आहे.
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीन या युवा खेळाडूने आपले कसोटी पदार्पण केले आहे.
Baggy Green No.459 for Cameron Green!
Pat Cummins presented the young allrounder with his cap before play in Adelaide #AUSvIND pic.twitter.com/T8AcW4z31y
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2020
पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ-
टिम पेन (कर्णधार), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरॉन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेडलवूड
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर विराट! पहिल्या कसोटीत तेंडुलकर व लाराचे ‘हे’ २ विक्रम करू शकतो आपल्या नावावर





