सिडनी| भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, वनडे आणि टी२० मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेतल्याने भारतात परतणार आहे.
त्यामुळे विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला महागात पडू शकते, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले आहे.
मायकल वॉन यांनी ट्विट केेले की ‘ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीची अनुपस्थिती. तो पहिल्यांदाच पालक बनणार असल्याने हा योग्य निर्णय आहे, पण याचाच अर्थ ऑस्ट्रेलिया सहज ही मालिका जिंकेल, हे माझे मत आहे.’
No @imVkohli for 3 Tests in Australia .. The right decision going to be at the birth of his first child .. but it means Australia will win the series quite easily IMO .. #JustSaying
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 10, 2020
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. ही कसोटी मालिका १९ जानेवारीला संपेल. पण याचदरम्यान विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पहिल्यांदाच पालक बनणार असल्याने विराटने पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांत खेळणार नाही.
कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेडला होणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. या सामन्यानंतर विराट भारतात परतणार असल्याने उर्वरित कसोटी मालिकेचे नेतृत्व उपकर्णधार अजिंक्य रहाणे करण्याची दाट शक्यता आहे.
तसेच या कसोटी मालिकेच्या आधी २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघ वनडे मालिका खेळेल. तर ४ ते ८ डिसेंबरदरम्यान भारतीय संघ टी२० मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर