भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्याची तिकीटविक्री सुरू झाली आहे. हा सामना 25 सप्टेंबरला हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी चाहते खूपच उत्साहीत आहेत. यासाठी त्यांनी तिकीटविक्रीच्या ठिकीणी मोठी गर्दी केली आहे. त्यानंतर काही काळातच गोंधळ सुरू झाला. अशावेळी पोलिसांना मध्ये पडावे लागले आहे.
जिमखाना रोड, हैद्राबाद येथे टी20 सामन्याच्या तिकीटांसाठी झालेल्या गर्दी, गोंधळामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येईल की कशाप्रकारे पोलिस लोकांवर लाठीचार्ज करत आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी लोकांनी पहाटे 3-4 वाजताच तिकीटांसाठी रांगा लावल्या. नंतर काही वेळातच मोठी गर्दी झाली, ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचरण करण्यात आले. मात्र चेंगराचेंगरी झाल्याने पोलिसांनी दांड्याने फटके मारत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी 4 लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे.
This is so disappointing. Passionated fans gathered at Gymkhana Ground to collect India Vs Australia tickets in Hyderabad and they're getting such treatment. https://t.co/OIP96BClOH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2022
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पंजाबच्या मोहाली येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली तर दुसरा सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपूर येथे खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि विराट कोहली याच्या लवकर विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी भारताने 6 विकेट्स गमावत 208 धावा केल्या होत्या. मात्र गोलंदाजांंची कामगिरी वाईट झाल्याने भारताने हा सामना गमावला.
@BCCI #HyderabadCricketAssociation this is how hyderabad association issues tickets to fans ,Without separating offline and online counters creating headache to public . #HCA #HyderabadCricketAssociation is the worst ever. @KTRTRS sir please look in to it pic.twitter.com/GZvRnEDm8q
— Mani Varma (@ManiVarma_18) September 22, 2022
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले जाणार आहेत. टी20 विश्वचषकापूर्वी खेळण्यात येणाऱ्या मालिका तिन्ही संघासाठी महत्वाच्या असणार आहेत. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये पुरूषांचा आठवा टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे.