ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने भारतीय संघावर विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार टिम पेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कठीण काळात फलंदाजीला येत त्याने महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर आता मेलबर्न येथे होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यापूर्वी पेनने म्हटले आहे की, आपल्या फलंदाजी क्रमामध्ये लवचीकता पाहिजे, जी वेळेनुसार बदलता येऊ शकेल.
पुढे बोलताना त्याने म्हटले की, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत केलेली कामगिरी दुसऱ्या कसोटीत त्यांच्यावर अतिरिक्त दबाव आणणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांतील दुसऱ्या कसोटी सामन्याला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शनिवारी (२६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे.
पेनने ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळाला. दुसऱ्या कसोटीपूर्वी शुक्रवारी (२५ डिसेंबर) पेनने म्हटले की, फलंदाज म्हणून मी कमी डाव खेळलो आहे. आणि त्यात मी इतक्या कमी धावसंख्येच्या खेळ्या केल्या होत्या की ज्याचा खेळावरही प्रभाव पडला असेल. मी धन्य आहे की, या महान संघात साधारणत: आमचे अव्वल ६ फलंदाज चांगली कामगिरी करतात.
“मागील सामन्यात मला आपले योगदान देण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे मला ते योगदान देऊन चांगले वाटले. जर मी ५/४०० किंवा ५/७० वर फलंदाजी करण्यासाठी जात असेल, तर माझ्यावर एक जबाबदारी असते. मी कोणासोबत फलंदाजी करतो आणि सामन्याची स्थिती काय आहे, यावर माझी भूमिका बदलते,” असे पेन आपल्या जबाबदारीबद्दल बोलताना म्हणाला.
“मला माझ्या फलंदाजी क्रमाबाबत लवचीकता ठेवायची आहे. अनेकवेळा माझा प्रयत्न असतो की मी धावा केल्या पाहिजेत. आणि ते ऍडलेडमध्ये घडले. अपेक्षा आहे की या आठवड्यात आम्ही खूप साऱ्या धावा करण्याचा प्रयत्न करू,” असेही तो आपल्या फलंदाजी क्रमाबाबत बोलताना म्हणाला.
पेनने नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्राच्या स्तंभात लिहिले होते की, मार्नस लॅब्यूशानेने शेफील्ड सामन्यादरम्यान त्याच्या फलंदाजीत तांत्रिकदृष्ट्या मदत केली.
त्याने पुढे बोलताना म्हटले की, “दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान मी काही बदल केले होते, जे मला चांगले वाटले. माझ्यासाठी ही वेळ आहे की, मी त्या बदलांना अंगीकारून त्याबद्दल विचार करण्याऐवजी त्यांना आपल्या व्यवहारात सामील करू. मला तो आनंद आता जाणवत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली ‘कॅप्टन कूल’ धोनीची प्रशंसा, म्हणाला…
मायदेशी परतण्यापूर्वी कोहलीने ‘हा’ संदेश देत वाढवले संघाचे मनोबल; अजिंक्य रहाणेने केला उलगडा
बीसीसीआयच्या बैठकीमध्ये घेतले गेले ‘हे’ प्रमुख १० निर्णय, वाचा पूर्ण माहिती