रांची | तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी आपली नेहमीची निळी कॅप न वापरता भारतीय आर्मीच्या रंगाची कॅप आज वापरली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना याद्वारे खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी संघातील खेळाडूंना माजी कर्णधार आणि लोकल बाॅय एमएस धोनीच्या हस्ते कॅप देण्यात आली. पुलवामा हल्लानंतर काही दिवसांतच भारतीय संघाने अशाप्रकारे भारतीय आर्मीला अभिवादन केले आहे.
A closer look at the camouflage caps which #TeamIndia is sporting today#JaiHind ???????????????? pic.twitter.com/3qExYp7Cvy
— BCCI (@BCCI) March 8, 2019
पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे ४० जवान शहिद झाले होते.
कर्णधार विराट कोहली यावेळी नाणेफेकीसाठी या स्पेशल कॅपमध्ये आला होता. कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर “ही कॅप खास आहे. आम्ही भारतीय आर्मीला सलाम करतो.” असे म्हटले होते.
To pay homage to the martyrs of Pulwama Terror Attack, the players will donate today's match fee to the National Defence Fund #JaiHind pic.twitter.com/vM9U16M8DQ
— BCCI (@BCCI) March 8, 2019
“या सामन्यात मिळणारी सर्व फी आम्ही जे जवान शहिद झाले आहे त्यांच्या परिवारासाठी देणार आहोत. मी सर्व भारतीयांना अवाहन करतो की सर्वांनी असं काहीतरी करत शहिदांच्या परिवाराला मदत करावी.” असेही कोहली यावेळी म्हणाला.
This is a special cap, it's a tribute to pulwama martyrs. We all are donating our match fees of this game to Nation's Defence Fund.
~ Virat Kohli @imVkohli @BCCI @BharatKeVeer #INDvAUS #PulwamaTerroristAttack pic.twitter.com/AOAq8ptySe— ???????????????????? (@LazyySaket) March 8, 2019






