सिडनी। रविवारी (25 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असणार आहे.
कारण आॅस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या या टी20 मालिकेत 1-0 अशी अघाडीवर आहे. आॅस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारतावर डकवर्थ लूईस नियमानुसार 4 धावांनी विजय मिळवला आहे.
तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात फक्त 19 षटकांचांच खेळ झाला असल्याने आणि आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केल्याने भारताला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता तिसरा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.
भारताने पहिल्यासामन्यातील 11 जणांचा संघच दुसऱ्या सामन्यातही खेळवला होता. मात्र तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन 11 जणांच्या भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
यामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन हीच जोडी सलामीला उतरेल. रोहितने पहिल्या सामन्यात 7 धावा करुन बाद झाला होता. पण त्याची मागील काही सामन्यात चांगली कामगिरी झाली आहे.
तसेच शिखर धवननेही पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत तोही चांगल्या लयीत असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर रोहित आणि शिखरच्या जोडीने सर्वाधिक धावा सलामीला खेळताना केल्या आहेत.
पण भारताला तिसऱ्या स्थानावर कोणाला खेळवायचे हा प्रश्न आहे. कारण ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेला केएल राहुल धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीच तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
असे असले तरी केएल राहुललाही 11 जणांच्या संघात संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. पण जर राहुलला संधी मिळाली नाही तर मनिष पांडेला त्याच्या ऐवजी खेळवण्याचीही शक्यता आहे.
मनिषच्या आक्रमक खेळाचा तळातल्या फलंदाजीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळे त्याचाही तिसऱ्या सामन्यासाठी विचार होऊ शकतो.
दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत या दोघांनाही 11 जणांच्या संघात स्थान दिले जाईल. पण पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. मात्र पंतला त्याच्या यष्टीरक्षणातील चूका सुधाराव्या लागणार आहेत. दोन्ही सामन्यात त्याच्याकडून काही चूका झाल्या होत्या. तसेच कार्तिकने ब्रिस्बेन सामन्यात चांगली फलंदाजी करत उपयुक्त धावा केल्या होत्या.
गोलंदाजांमध्ये दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खलील अहमद आणि कुलदीप यादवची जागा जवळजवळ पक्की आहे. या दोघांनी दोन सामन्यात मिऴून प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच खलीलने दोन्ही सामन्यात महत्त्वाच्या विकेट्स भारताला मिळवून दिल्या आहेत. तसेच कुलदीपच्या फिरकीचाही भारताला उपयोग झाला आहे.
त्याचबरोबर जसप्रीत बुमराहलाही 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळेल. तो भारताच्या संघातील मुख्य वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे भारतीय संघ त्याला वगळण्याची चूक करणार नाही. त्याने दोन्ही सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतली असली तरी त्याने फलंदाजांच्या धावांवर अंकूश ठेवले आहे.
बुमराहप्रमाणेच भुवनेश्वर कुमारही भारताचा या मालिकेसाठी मुख्य वेगवान गोलंदाज आहे. त्याने दुसऱ्या सामन्यात सुरुवातीला विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे त्याची अशीच कामगिरी तिसऱ्या सामन्यातही होईल अशी भारतीय संघाला अपेक्षा असेल.
असे असले तरी अष्टपैलू कृणाल पंड्याला मात्र सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून वगळण्याची शक्यता आहे. कृणालची गोलंदाजीमध्ये खास कामगिरी झालेली नसल्याने त्याच्या ऐवजी युजवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते.
चहलकडे महत्त्वाच्या वेळी विकेट घेण्याची क्षमता असल्याने आणि फिरकी गोलंदाज म्हणून दुसरा पर्याय म्हणून त्याला ही संधी मिळू शकते.
असा असेल 11 जणांचा संभाव्य भारतीय संघ- विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, खलील अहमद
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीतून ७ जणांचा खून
–ब्रावोने शब्द पाळला, आपली बॅट दिली त्या खास व्यक्तीला
–जगातील सर्वच दिग्गज क्रिकेटपटूंचे विक्रम मोडले बांगलादेशच्या शाकिबने