पहिले दोन कसोटी सामने जिंकून अति आत्मविश्वासाने इंदोर कसोटी सामन्यात उतरलेल्या भारतीय संघाचा अपेक्षाभंग झाला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभूत केले आणि मालिकेत पुनरागमन केले. या विजयासोबत पाहुण्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही एन्ट्री केली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तिसऱ्या दिवशी 76 धावांची गरज होती. हे आव्हान त्यांनी 19व्या षटकात 1 विकेट गमावत पूर्ण केले. अशात या दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला स्लेज केले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसऱ्या डावात ट्रेविस हेड (Travid Head) 49 धावा करून नाबाद राहिला. हा कसोटी सामना संपला असला, तरीही या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचा आवाज ऐकू येत आहे. तो हेडला स्लेज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला केले स्लेज
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या षटकादरम्यान घडली. हे षटक रवींद्र जडेजा टाकत होता आणि श्रेयस अय्यर शॉर्ट फाईन लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. या व्हायरल व्हिडिओत तो हेडला स्लेज करताना दिसत आहे. तो म्हणतो की, “याचा एक पाय चंदीगडमध्ये आहे आणि दुसरा हरियाणामध्ये आहे.”
— The Game Changer (@TheGame_26) March 4, 2023
मात्र, हेडला त्यांचे बोलणे समजले नाही. तो शांततेत फलंदाजी करताना दिसला. सध्या या मालिकेत भारत 2-1ने आघाडीवर आहे. मात्र, आता चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना भारताने जिंकला, तर संघ थेट जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (World Test Championship Final) एन्ट्री करेल. मात्र, भारताने हा सामना गमावला, तर मालिका बरोबरीत सुटेलच, पण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशाही लांबणीवर पडतील. अशात आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावा लागेल. (india vs australia 3rd test shreyas iyer sledges travis head in indore test match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॅटच्या मधोमध लागला चेंडू, कर्णधाराने झटकन घेतला रिव्ह्यू; आता जगभरात उडवली जातेय खिल्ली, पाहा व्हिडिओ
‘वडिलांच्या निधनाबाबत कळल्यावर अत्यंत दु:ख झाले…’, नरेंद्र मोदींचे उमेश यादवला पत्र