भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला 8 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे अजिंक्य रहाणेचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने उत्तम पद्धतीने नेतृत्व करताना उत्कृष्ट शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे एॅडलेड मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढता आला. सामना संपल्यानंतर आर अश्विनने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे.
अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करताना पहिल्या दिवशीच आपले कौशल्य दाखवताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवले. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सर्वबाद करताना 195 धावसंख्येवर रोखला. यामध्ये अजिंक्य रहाणेने भारतीय गोलंदाजांचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर केला होता. त्यामुळे सर्व दिग्गज खेळाडूंनी अजिंक्य रहाणेचे अभिनंदन केले होते. यामध्ये आता भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू अश्विन सुद्धा उतरला आहे. अजिंक्य रहाणेचे कौतुक करताना अश्विन म्हणाला, “विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणे ड्रेसिंग रूममध्ये धैर्य निर्माण केले.”
भारताचा फिरकीपटू अश्विन ‘क्रिकेट सेव्हन’ सोबत बोलताना म्हणाला, “36 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर पुनरागमन करणे कधीच सोपे नव्हते. आपल्या देशाच्या क्रिकेटवर गर्व आहे. विराट कोहली नसणे, हे संघासाठी कठीण होते. परंतु आम्ही खूप चांगले पुनरागमन केले. ड्रेसिंग रूममध्ये जिंक्सने धैर्य निर्माण केले, ज्याची संघाला गरज होती. आम्ही या सामन्यात आमच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलो. ”
पहिल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारतीय संघ 0-1 ने पिछाडीवर होता. त्याचबरोबर भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला होता. त्यामुळे भारतीय संघाला हा एक मोठा धक्का बसला होता. फलंदाजी करताना मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला.
मात्र अजिंक्य रहाणेने दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशीच 11 व्या षटकात चेंडू अश्विनच्या हाती दिला. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना पहिल्याच षटकात भारतीय संघाला यश मिळवून दिले. तसेच इतर गोलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 195 धावसंख्येवर आटोपला.
अश्विन स्मिथच्या विकेट बदल बोलताना म्हणाला, “जर तुम्ही ऑस्ट्रेलियात येवून स्मिथची विकेट घेवून शकला नाही, तर तुमचा रस्ता नेहमी अवघड होणारा असणार आहे. त्याला लवकर बाद करण्यासाठी आम्ही नेहमी रणनिती आखत असतो. आम्ही मिळून रणनिती बनवतो. त्याचबरोबर जेव्हा ही रणनिती यशस्वी होते तेव्हा आनंद होतो.”
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्वबाद 195 धावसंख्या होती. त्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. त्यांनतर ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या डावात सर्वबाद 200 धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य दिले होते. ते भारतीय संघाने आपल्या दुसर्या डावात 2 गडी गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला.
संबंधित बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितच्या पुनरागमनाबद्दल अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला






