---Advertisement---

ती खास बॅट वापरुनही मुंबईकर अजिंक्य रहाणे ठरला दुर्दैवी

---Advertisement---

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव सर्वबाद 250 धावांवर संपला. यामध्ये भारताकडून चेतेश्वर पुजाराने 246 चेंडूत 123 धावांची उत्तम खेळी केली.

यावेळी पहिल्या दिवशी फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेच्या बॅटने सगळ्यांचे लक्ष वेधले. त्या बॅटवर राहुल द्रविडची सही आणि शुभेच्छा दिलेले स्पष्ट दिसत होते.

द्रविड आणि रहाणे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकत्र खेळले आहेत. तसेच रहाणेने नेहमीच त्याच्या फलंदाजीचे श्रेय द्रविडला देत आला आहे.

मात्र यावेळी रहाणे 31 चेंडू खेळून 13 धावावर बाद झाला. त्याला जोश हेझलवूडने पिटर हँड्सकॉम्बच्या मदतीने बाद केले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताची पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या केएल राहुल(2), मुरली विजय(11),  आणि कर्णधार विराट कोहली(3)या चार फलंदाजांनी एकापाठोपाठ स्वस्तात विकेट गमावल्या.

आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क(2/63), पॅट कमिन्स(2/49), जोश हेझलवूड(2/53) आणि नॅथन लायनने(2/83) विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या बदल्यात 191 धावा केल्या आहेत. यामध्ये भारताकडून आर अश्विन(3/50), इशांत शर्मा(2/31) आणि जसप्रीत बुमराह(2/34) यांनी विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत

गौतम गंभीरची कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात ‘नाद’ खेळी

ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment