गेल्या दोन हंगामांपासून सातत्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मंगळवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी वर्षासाठी त्यांच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघाचं वेळापत्रक जाहीर केलं. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चीही घोषणा करण्यात आली.
यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात येणार असून मालिकेत एकूण पाच कसोटी सामने खेळले जातील. मालिका 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे.
बॉर्डर गावस्कर मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
आतापर्यंत एकूण 16 वेळा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. यापैकी टीम इंडियानं 10 वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर कांगारू केवळ 5 वेळा ही ट्रॉफी जिंकले आहेत. 2003-04 मध्ये एकदा ही मालिका अनिर्णित राहिली होती. गेल्या पाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपैकी भारतानं सलग चार मालिका जिंकल्या आहेत. यापैकी दोन वेळा टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केलं. आता पुन्हा एकदा 17 वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियात होणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ गतविजेता असला तरी सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाची कामगिरी सातत्यानं उत्कृष्ट राहिली आहे. या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. यावर्षी टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा असून न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातही मालिका खेळायची आहे. भारतीय संघानं मागील दोन्ही हंगामांची अंतिम फेरी खेळली होती. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियानं भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं. तर त्या आधी 2021 मध्ये पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जुनं ते सोनं! क्रिकेटपटू ते समालोचक अन् आता फिनिशर; अशी आहे दिनेश कार्तिकची कारकीर्द
विराट कोहलीला भेटण्यासाठी काहीही! मैदानाची सुरक्षा मोडून चाहता थेट क्रीजवर, पाहा VIDEO
समालोचकानं आरसीबीच्या गोलंदाजासाठी वापरला ‘कचरा’ शब्द, संघाकडून जोरदार प्रत्युत्तर