---Advertisement---

विराट कोहलीला भेटण्यासाठी काहीही! मैदानाची सुरक्षा मोडून चाहता थेट क्रीजवर, पाहा VIDEO

---Advertisement---

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. प्रत्येकाला त्याची एक झलक पाहायची असते. यासाठी काहीवेळा चाहते सुरक्षेचं देखील उल्लंघन करतात. असंच काहीसे आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात पाहायला मिळालं.

सोमवारी (25 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात कोहलीनं शानदार फलंदाजी केली. त्यानं 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 77 धावांची खेळी केली. कोहली फलंदाजीला आला तेव्हा एक चाहता मैदानावरील सुरक्षेला चकमा देत थेट क्रीजवर पोहोचला.

चाहत्याचा क्रीजवर जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरसीबीच्या इनिंगच्या सुरुवातीला फॅन सुरक्षा कठडा तोडून मैदानात घुसला. तो कोहलीच्या जवळ आला आणि त्यानं कोहलीच्या पायाला स्पर्श केला. यानंतर चाहत्यानं कोहलीला मिठी मारली. सुरक्षा कर्मचारीही चाहत्याच्या मागे धावत आले आणि ते त्याला पकडून परत घेऊन गेले.

विशेष म्हणजे, विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्यांनी सुरक्षा मोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही कोहलीचे अनेक चाहते अशा पद्धतीनं मैदानात उतरले आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एका चाहत्यानं असंच केलं ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

 

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पंजाब विरुद्ध आरसीबीनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यांनी पंजाबला निर्धारित 20 षटकात 176/6 पर्यंत रोखलं आणि नंतर 19.2 षटकात 178/6 बनवून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीनं अनेक विक्रम आपल्या नावे केले. टी20 क्रिकेटमध्ये 100 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं आयपीएलमध्ये 51वी अर्धशतकी खेळी खेळली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्यानं ५० अर्धशतकं झळकावणाऱ्या शिखर धवनला मागे टाकलं. याशिवाय कोहलीनं आयपीएलमध्ये 650 चौकारांचा टप्पा पार केला. हा टप्पा गाठणारा तो दुसरा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 । अर्धशतकाच्या जोरावर विराटचा महाविक्रम, गेल आणि वॉर्नरनंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच

कार्तिकच्या मॅच विनिंग चौकारने फुटला आरसीबीचा नारळ, पंजाबवर 4 विकेट्स राखून मात

मोठी बातमी! रेप केसमध्ये अडकला ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियन महिलेकडून गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---