दिनेश कार्तिक याने शेवटच्या 10 चेंडूत 28* धावा ठोकत आरसीबीला आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवून दिलाा. आरसीबीने 177 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 19.2 शटकांमध्ये आरसीबीने पंजाबला 4 विकेट्स राखून मात दिली. सलामीला आलेल्या विराट कोहली यानेही संघासाठी मोलाचे योगदान दिले.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 6 विकेट्सच्या नुकसानावर 176 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार शिखर धवन याने यात सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबीसाठी विराटने डावाची सुरुवात करताना 49 चेंडूत 77 धावांची खेळी केली. विराटव्यतिरिक्त पहिल्या सहा खेळाडूंमध्ये एकालाही मोठी खेळी करता आली नाही. पण सातव्या क्रमांकावर आलेल्या कार्तिकने पुन्हा एकदा फिनिशर म्हणून स्वतःला सिद्ध केले. 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 28* धावा केल्या आणि सामना नावावर केला. महिपाल लोमरोर यानेही 8 चेंडूत 17* धावांची खेळी केली.
What a finish 🔥
What a chase 😎An unbeaten 48*-run partnership between @DineshKarthik and @mahipallomror36 wins it for the home team 💪@RCBTweets register a 4-wicket win!#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/0BFhn9BRnC
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2024
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीसाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिस 3, कॅमरून ग्रीन 3, रजत पाटीदार 18, ग्लेन मॅक्सवेल 3, तर अनुज रावत 11 धावांवर बाद झाले. कार्तिकसह महिपाल लोमरोर याने 17* धावांची खेळी केली. पंजाबसाठी गोलंदाजी विभागातील कागिसो रबाडा आणि हरप्रीत बरार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल आणि सॅम करन यांनाही प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजासाठी धवनव्यतिरिक्त प्रभसिमरन सिंग 25, सॅम करन 23, तर जितेश शर्मा 27 धावांची खेळी करू शकले. जॉनी बेअरस्टो 8, तर लियाम लिविंगस्टोन 17 धावांवर बाद झाले. शशांक सिंग याने शेवटच्या षटकांमध्ये 8 चेंडूत 21 धावांची वादळी खेळी केली. तर हरप्रीत बरार याने नाबाद 2 धावा केल्या. मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. यश दयार आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
(RCB HAVE DEFEATED PUNJAB KINGS AT THE CHINNASWAMY.)
दोन्ही संघांची प्लेयिंग इलेवेन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टिरक्षक), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
पंजाब किंग्ज –शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर.
महत्वाच्या बातम्या –