भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला मेलबर्न क्रिकेट मैदानावर शनिवारपासून (26 डिसेंबर) सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा पालकत्व रजेवर भारतात परतला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पदभार अजिंक्य रहाणे सांभाळत आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे भलेही नाणेफेक पराभूत झाला. परंतु आपल्या नेतृत्त्वगुणांनी त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 72.3 षटकात 10 गडी गमावून 195 धावसंख्या उभारली. अजिंक्य रहाणे आपल्या चाणाक्ष रणनितीचा वापर करताना योग्य वेळी योग्य गोलंदाजांना षटके देऊन ऑस्ट्रेलिया संघावर दबाव बनवण्यात यशस्वी ठरला. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य सिद्ध करत ऑस्ट्रेलियाला संघाला मोठी भागीदारी करू दिली नाही. तसेच सातत्याने गडी बाद करून ऑस्ट्रेलिया संघावर दडपण आणले.
विराट कोहली झाला ट्रोल
त्यामुळे अजिंक्य रहाणेचे हे नेतृत्त्वगुण पाहून चाहते खूप प्रभावित झाले. त्याचबरोबर मागील सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीला ट्रोल करत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आणि मिम्सचा समावेश आहे.
#INDvsAUS
*VIRAT Kohli Watching Ajinkya Rahane Captaincy-: pic.twitter.com/G8A88qu56N— Desi Garfield (@dehatigarfield) December 26, 2020
#INDvsAUS
Fans of Indian cricket after BCCI announced Ajinkya Rahane as the captain of the Indian team for the second Test in place of Virat KohliFans:- virat kohli kaha hai ??
Le * captain kohli pic.twitter.com/dDeIhsmKGA
— ???????????????? ???????????????????????? ????????????????????????️ (@Er_jasbharti) December 25, 2020
Virat kholi after watching Ajinkya Rahane do the Captaincy.#AUSvIND pic.twitter.com/T5i6q0Iu4b
— Rj Teja (@JaiswalTanmay) December 26, 2020
Virat kholi after getting run out by Rahane :- #ViratKohli #AjinkyaRahane #INDvsAUSTest pic.twitter.com/IzMeUqCTpu
— Ayush Dwivedi (@AyushDwivedi777) December 18, 2020
Santa is there with India, No worries Rahane.
kohli #AUSvsIND #MerryChristmas pic.twitter.com/GAfGcyVpPy
— BALIDAN4INDIA (@peacei24) December 26, 2020
Indian team everytime Ajinkya Rahane captains the side in the absence of Virat Kohli #AUSvIND pic.twitter.com/dc180IzHNR
— Vinesh Prabhu (@vlp1994) December 26, 2020
भारतीय गोलंदाजांची जोरदार कामगिरी
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक बळी घेतले. त्याने 16 षटके टाकत 56 धावा देताना 4 गडी बाद केले. अश्विनने पुन्हा एकदा आपले फिरकीचे जाळे टाकत 35 धावा देताना ऑस्ट्रेलिया संघाचे 3 फलंदाज बाद केले. पदार्पण करणार्या मोहम्मद सिराजने 40 धावा देत दोन बळी टिपले. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने 15 धावा देताना 1 गडी बाद केला.
दिवसाअखेर भारताची धावसंख्या 1 बाद 36
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 195 धावावर सर्वबाद केले. त्यामुळे भारतीय संघाने आपल्या डावाला सुरुवात करताना पहिला दिवस संपेपर्यंत 1 बाद 36 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने मयंक अगरवाल याच्या रूपाने पहिल्या षटकात 1 गडी गमावला. त्याला मिचेल स्टार्कने पायचीत केले. त्याचबरोबर पुजारा आणि शुबमन गिल अनुक्रमे 7 आणि 28 धावांवर नाबाद आहेत.
मात्र, विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर मायदेशी परतला आहे. विराट पालकत्व रजेवर असल्यामुळे उर्वरीत सामन्यात सहभागी होवू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
अपने साथ मत जोडिये, हम अलग है! मयंक पुन्हा अपयशी ठरताच भन्नाट मिम्स व्हायरल
कौतुकास्पद! पदार्पणवीर सिराजचे हनुमा विहारीने वाढवले मनोबल; ‘हे’ होते कारण
‘बॉक्सिंग डे’ सामन्यातून कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे भारतीय खेळाडू, ही आहेत नावे






