ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत भारताचा कर्णधार केएल राहुल याने षटकार खेचत संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिकेतही 1-0ने आघाडी घेतली. मात्र, भारताने विजय मिळवल्यानंतर मैदानावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी क्रीझवर उपस्थित केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्याशी हातमिळवणी केली. दुसरीकडे डेविड वॉर्नर मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्याने जडेजाच्या हेल्मेटवर चापट मारली.
वॉर्नरने जडेजाला मारली चापट
खरं तर, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर आणि रवींद्र जडेजा (David Warner And Ravindra Jadeja) हे चांगले मित्र आहेत. या दोघांमध्ये नेहमीच चेष्टा-मस्करी होते. यापूर्वीही आयपीएल 2023दरम्यान दोघांना मजा-मस्ती करताना पाहिले गेले होते. जेव्हा वॉर्नरने जडेजाला धावबाद करण्यासाठी उकसावले होते, तेव्हा जडेजानेही चेंडू दाखवून प्रतिक्रिया दिली होती. यावर वॉर्नरने जडेजाचे प्रसिद्ध तलवारबाजी सेलिब्रेशन केले होते. यानंतर दोघेही खेळाडू हसले होते.
The way David Warner imitated Jadeja's bat swing move was simply electric! It's a timeless moment that never loses its charm pic.twitter.com/ZWTTe5zp0k
— WarpaintJournal.in (@WarpaintJ) September 17, 2023
अशात आता हे दोघे खेळाडू एकमेकांना भेटले, तेव्हा हा क्षण पाहण्याजोगा होता. ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला होता. मात्र, वॉर्नरच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्याने आधी केएल राहुल (KL Rahul) याच्याशी हात मिळवला. तसेच, जेव्हा तो जडेजाला हात मिळवण्यासाठी गेला, तेव्हा त्याने हात मिळवलाच, पण त्यानंतर मजेत त्याच्या हेल्मेटवर चापट मारली. यामुळे जडेजा थोडासा खालीही झुकला आणि हसत पुढे गेला. मात्र, काही चाहत्यांना हे आवडले नाही. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या.
Sealed with a SIX.
Captain @klrahul finishes things off in style.#TeamIndia win the 1st ODI by 5 wickets.
Scorecard – https://t.co/H6OgLtww4N… #INDvAUS@IDFCFIRSTBank pic.twitter.com/PuNxvXkKZ2
— BCCI (@BCCI) September 22, 2023
https://twitter.com/no145430835/status/1705278438867640681
सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आधी गोलंदाजी करताना 10 षटकात 51 धावा खर्चून 1 विकेट घेतली. तसेच, त्यानंतर फलंदाजी करताना 6 चेंडूत नाबाद 3 धावाही केल्या.
वॉर्नरची अर्धशतकी खेळी
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याच खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. फक्त डेविड वॉर्नर (David Warner) अर्धशतक ठोकण्यात यशस्वी झाला. त्याने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून 53 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊसही पाडला होता. (india vs australia david warner slaps ravindra jadeja on helmet in fun see video here)
हेही वाचा-
भारताविरुद्ध पराभूत होऊनही ऑसी कर्णधाराला पराकोटीचा आनंद! स्पष्टच म्हणाला, ‘मी पर्सनली खुश आहे…’
पहिल्या वनडेत कांगारूंच्या नांग्या ठेचल्यानंतर राहुलची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला याची सवय…’