भारतीय संघाला शुक्रवारी (22 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वनडे सामना खेळायचा आहे. उभय संघांतील ही वनडे मालिका तीन सामन्यांची असून पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या सामन्यातून संघात पुनरागमन करू शकतो. अश्विन आणि रविंद्र जडेजा मोठ्या काळानंतर एकत्र वनडे सामना खेळताना दिसतील.
शुक्रवारी (22 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. आशिया चषक 2023 मध्ये नुकतेच भारताला विजेतेपद मिळाले. पण या संघात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) नव्हता. आशिया चषकात अश्विनचे नाव वगळल्यामुळे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अश्विनला संघात सामील केले गेले आहे. अश्विन जर शुक्रवारी प्लेइंग इलेव्हनचा भाग असला, तर चाहत्यांना तब्बल 6 वर्षांनंतर भारताचे दोन फिरकीपडू एकत्र वनडे सामना खेळताना दिसतील. होय, अश्विन आणि जडेजा मागच्या 6 वर्षांत एकाही वनडे सामन्यात एकत्र खेळले नाहीत. त्यांना एकत्र खेळलेला शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये खेळला होता. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना खेळला गेला होता. (Ravichandran Ashwin and Ravindra Jadeja will play together in an ODI match after six years)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन –
शुबमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक) रविंद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम आकडे असणाऱ्या रोहित-विराटला विश्रांती कशामुळे? स्वतः द्रविडनेच केलं स्पष्ट
सूर्यकुमारला मिळाले अल्टिमेटम? ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी कोचचे मोठे विधान






