---Advertisement---

‘भारतीय संघात खराब शॉट खेळून बाद होण्याची स्पर्धा सुरू आहे का?’ पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांचा प्रश्न

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यातील तिसरा दिवस रविवारी(17 जानेवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना सर्वबाद 336 धावा केल्या. या डावात भारताच्या बरेच खेळाडू चूकीचे शॉट खेळून बाद झाले. यामध्ये जेव्हा रिषभ पंत चुकीचा शॉट खेळून बाद झाला, तेव्हा चाहते खूप नाराज झाले. त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. पंतला ट्रोल करत आहेत.

भारतीय संघाच्या पहिल्या डावात सर्वात प्रथम रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला होता. त्यांनंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मयंक अगरवाल चुकीचा शॉट खेळून बाद झाले होते. त्यांनंतर रिषभ पंतने त्याच चुकीची पुनरावृत्ती करताना खराब शॉट खेळून बाद झाला. त्यामुळे चाहत्यांनी आपली नाराजी दर्शविताना रिषभ पंतला ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघावर ताशेरे ओढत आहेत.

जोश हेझलवूडने ऑफ़ स्टॅम्पच्या बाहेर शॉर्ट चेंडू टाकला होता, जो चेंडू रिषभ सोडू शकत होता. मात्र त्याने तसे न करता हा चेंडू खेळला. त्यांनंतर हा चेंडू त्याच्या बॅटची कड घेवून स्लिपमध्ये उभा असलेल्या कॅमेरान ग्रीनकडे गेला. त्यानी कोणतीही चूक न करता हा झेल घेतला. त्यामुळे पंत 23 धावांवर बाद झाला.

रिषभ पंत 23 धावा करून पूर्णपणे सेट झाला होता. मात्र अचानक खराब शॉट खेळला आणि बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. त्याचबरोबर तो बाद झाल्यानंतर चाहत्यांनी विचारले की, भारतीय संघात खराब शॉट खेळून बाद होण्याची स्पर्धा सुरू आहे का? कारण त्याच्या अगोदर 3 भारतीय खेळाडू खराब शॉट खेळून बाद झाले होते. यामध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि मयंक अगरवाल यांचा समावेश होता.

 

https://twitter.com/mrkebb/status/1350643680256864258?s=19

https://twitter.com/tusharupreti123/status/1350702379620999169

सर्वात पहिल्यांदा खराब शॉट खेळण्याची सुरुवात रोहित शर्माने केली होती. तो 44 धावा करून सेट झाला होता. मात्र नॅथन लायनच्या गोलंदाजीवर आक्रमक शॉट खेळत बाद झाला. त्यांनतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सुद्धा सेट झाला होता. परंतु विनाकारण 7 व्या स्टम्पवर असलेल्या चेंडू खेळून बाद झाला. तो 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयंकने सुद्धा ऑफ़ स्टॅम्पच्या बाहेर जात असलेल्या चेंडूवर खेळताना बाद झाला. त्याने 38 धावा केल्या.

त्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरताना शार्दूल ठाकूर आणि वाशिंग्टन सुंदर या दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय संघाने 300 धावांचा टप्पा पार केला.शार्दूल ठाकूरने 67 आणि वाशिंग्टन सुंदरने 62 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ भारतीयांचा कसोटी पदार्पणात नुसता धुराळा; केला ३ विकेट्स आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम

तळातील क्रमांकावर फलंदाजीला येत विरोधी संघाला धू धू धुणारे भारतीय कसोटी पदार्पणवीर, सुंदरचाही समावेश

वय छोटे पण पराक्रम मोठे! वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू कामगिरीसह केला ‘हा’ खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---