ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यादरम्यान १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) सुरुवात होणार आहे. मालिका सुरू होण्यास आणखी एका आठवडा शिल्लक असताना अनेक दिग्गज या मालिकेविषयी आपापली मते व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यानेदेखील आगामी मालिकेच्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हेडनने भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा याचे तोंड भरून कौतुक केले.
हेडनने केली पुजाराची स्तुती
हेडनने एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “आम्हा ऑस्ट्रेलियन लोकांना कॉफी खूप आवडते. पुजाराची फलंदाजी पाहण्यासाठी आमच्याकडे भरपूर कॉफिन शिल्लक आहे. त्याने मागील मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेण त्रस्त केले होते. सध्या आपण अशा जमान्यात आहोत, जिथे लोकांना चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारे फलंदाज पहायला आवडतात. मात्र, पुजारा कमी स्ट्राईक रेट असूनही विरोधी संघांवर वर्चस्व गाजवतो.”
सुनील गावसकरांनीही केले पुजाराचे कौतुक
याच मुलाखतीत भारताचे दिग्गज सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर हे देखील सहभागी झाले होते. त्यांनीदेखील पुजाराचे कौतुक करताना म्हटले,
“पुजाराने मागील काही दिवसात क्रिकेट खेळले आहे की नाही याने काहीही फरक पडत नाही. तो मानसिकदृष्ट्या अत्यंत कणखर आहे. त्याला खेळपट्टीवर वेळ घालवायला आवडते. मागील दोन वर्षात पुजाराने आपल्या फलंदाजीच्या तंत्रात बरीच सुधारणा केलेली दिसून येतेय.”
मागील मालिकेत पुजारा होता मालिकावीर
पुजाराने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत ७७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १८ शतकांच्या मदतीने ५,८४० धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ४६.१९ राहिलाय. त्याचवेळी त्याची सरासरी ४८.६७ अशी सुदृढ आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियामध्ये २०१८-२०१९ च्या कसोटी मालिकेत ४ सामन्यात ३ शतकांसह ५२१ धावा केल्या होत्या. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता.
संबधित बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– मी तयारी करून आलो आहे, कसोटी मालिकेआधी युवा भारतीय खेळाडूचे वक्तव्य
– Video: पुजाराविरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची असणार ही रणनिती; पहिल्या सराव सामन्यात अशाप्रकारे केले बाद