Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसोटी मालिका गमावलेला ऑस्ट्रेलियन संघ जिंकणार वनडे मालिका? जाणून घ्या आकडेवारी

कसोटी मालिका गमावलेला ऑस्ट्रेलियन संघ जिंकणार वनडे मालिका? जाणून घ्या आकडेवारी

March 16, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
India vs Australia

Photo Courtesy:BCCI.tv


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (13 मार्च) संपली. यावर्षीही बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताने नावावर केली. ही कसोटी मालिका भारताने जिंकल्यानंतर उभय संघांतील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडल्याचे दिसले. पण वनडे मालिकेत मात्र चित्र पूर्णपणे वेगळे असू शकतो. उभय संघांतील वनडे आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला शुक्रवारी सुरू होणाऱ्या वनडे मालिकेविषयी अंदाज येऊ शकतो.

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील (BGT 2023) पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसरा सामना बारताने 6 विकेट्सच्या अंतराने नावावर केला. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड राहिले. पण चौथ्या सामन्यात भारताने पुन्हा चांगले प्रदर्शन करून सामना अनिर्णित केला. परिणामी या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. कसोटी मालिकेच पाहिल्यानंतर अनेकांनी वनडे मालिकेत (India vs Australia ODI Series) देखील भारतीय संघ चांगले प्रदर्शन करणार, असा समज करून घेतल्याचे दिसते. पण आकडेवारी पाहता वनडे मालिकेत भारतासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान वाटते तितके सोपे नसेल.

ऑस्ट्रेलियन संघाने 2019 साली भारत दौऱ्यावर असताना यजमान संघाला धूळ चारली होती. आकडेवारीवर नजर टाकली, तर या दोन बलाढ्य संघांमध्ये आजपर्यंत एकूण 143 वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील 80 सामने ऑस्ट्रेलियाने, तर 53 सामने भारताने जिंकले. तसेच भारतात खेळलेल्या वनडे सामन्यांचा विचार केला, तर भारताने 64 पैकी 29 सामन्यांमध्ये, तर ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यांमध्ये विजय मिळवला.

दरम्यान, ऑस्ट्रेलन संघ 2019 मध्ये भारत दौऱ्यावर असताना वनडे मालिकेत भारताचा 2-3 असा पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवत आघाडी घेतली. पण शेवटच्या तीन सामन्यांमध्ये मात्र ऑस्ट्रेलायने जोरदार पलटवार केला. शेवटचे तिन्ही सानने ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि मालिका नावावर केली. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा याने दोन शतकांच्या मदतीने मालिकेत 383 धावा केल्या होत्या. ख्वाजा सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरलेला, तर भारतासाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. विराटने या पाच सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने 310 धावा केल्या होत्या.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक
17 मार्च (मुंबई, दुपारी 1.30 वाजता) – पहिला वनडे सामना
19 मार्च (विशाखापट्टनम, दुपारी 1.30 वाजता) – दुसरा वनडे सामना
22 मार्च (चेन्नई, दुपारी 1.30 वाजता) – तिसरा वनडे सामना
(India vs Australia Head to Head Records in ODIs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स तयार, पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू बनला कर्णधार
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना


Next Post
West-Indies

वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये मोठा बदल, इंग्लंडच्या पावलावर पाऊल टाकणार कॅरेबियन संघ

Photo Courtesy: Twitter

आरसीबीला पहिला विजय मिळवून देणारी कनिका आहे तरी कोण? वनडेत ठोकलय चक्क त्रिशतक

Pakistan-Team-Sachin-Tendulkar

"मी सचिनला शिव्या दिलेल्या" 27 वर्षानंतर माजी पाकिस्तानी खेळाडूची कबुली

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143