Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स तयार, पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू बनला कर्णधार

आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स तयार, पंतच्या जागी 'हा' खेळाडू बनला कर्णधार

March 16, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Delhi-Capitals

Photo Courtesy: iplt20.com


इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराचा निर्णय मात्र अद्याप झाला नाही. नियमित कर्णधार रिषभ पंत याला अपघातात गंभीर दुखापत झाल्याने तो आगामी आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. अशात पंतच्या जागी दिल्लीचे कर्णधारपद कोण सांभाळणार असा प्रश्न चाहत्यांना मागच्या बऱ्याच दिवसांपासून पडला आहे. अशातच गुरुवारी (16 मार्च) सकाळी ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर याला दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

डेविड वॉर्नर (David Warner) याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्याच्याच नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल 2016 (IPL 2016) चा विजेता बनला होता. असे असले तरी, हैदराबाद फ्रँचायझीकडून नंतर वॉर्नरकडे दुर्लक्ष केले गेले आणि सलामीवीर फलंदाजाने हा संघ सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबादला विजेतेपद पटकावून देणारा वॉर्नर यापूर्वीही दिल्ली संघाचा भाग राहिला आहे. अशात यावर्षी वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

आयपीएलच्या इतिहासात वॉर्नर सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबदीत वॉर्नर संयुक्तरित्या पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 69 आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून यातील 35 सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वात 32 सामन्यांमध्ये संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. वॉर्नर एक यशस्वी कर्णधार आहेच, पण सोपतच त्याचे वैयक्तिक प्रदर्शन देखील दमदार राहिले आहे. अशात दिल्ली कॅपिटल्सला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकवून दण्याची जबाबदारी तो कसे पेलणार, हे पाहण्यासारखे असेल. भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार असेल.

David Warner 👉🏼 (𝗖)
Axar Patel 👉🏼 (𝗩𝗖)

All set to roar loud this #IPL2023 under the leadership of these two dynamic southpaws 🐯#YehHaiNayiDilli | @davidwarner31 @akshar2026 pic.twitter.com/5VfgyefjdH

— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2023

आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. गतविकेचा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाईल. हंगामातील तिसऱ्या सामन्यात 1 एप्रिल रोजी डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना होईल.
(David Warner will be the captain of Delhi Capitals for IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर WPL मध्ये आरसीबीची बोहनी! युवा कनिका आणि पेरी ठरल्या पहिल्या विजयाच्या शिल्पकार
मेव्हण्यासाठी कायपण! बायकोच्या बंधूसाठी रोहितने टाकली पहिल्या वनडेला सुटी, टीम इंडियाला सोडून ‘तिकडं’च लावणार हजेरी


Next Post
Virat Kohli

'15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही...', विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना

MS-Dhoni-and-Suresh-Raina

धोनीप्रेमींसाठी रैनाने दिली आनंदाची बातमी, आयपीएल 2024मध्येही खेळणार थाला?

India vs Australia

कसोटी मालिका गमावलेला ऑस्ट्रेलियन संघ जिंकणार वनडे मालिका? जाणून घ्या आकडेवारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143