कोलकाता । भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कोलकाता येथील इडन गार्डन मैदानावर २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघ काल दुपारी ठीक ३वाजून ३० मिनिटांनी येथे पोहचला.
भारतीय संघ व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे काल संघाने येथे सराव केला नाही. परंतु आजही संघाला सराव करता आला नाही. मैदानावर सकाळपासूनच कव्हर टाकण्यात आले आहे. पहिल्या दोन सामन्यात येथे मोठी वृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारताचे सराव सत्राचे आज दुपारी नियोजन करण्यात आले होते परंतु पावसामुळे त्यावर पाणी फेरले गेले.
https://www.instagram.com/p/BZNoqBKnza_/
जर स्थिती अशीच राहिली तर चेंडू बॅटवर थांबून येण्याची शक्यता पूर्व विभागाचे क्युरेटर आशिष भोवमिक यांनी व्यक्त केली आहे.
#Weather Forecast for Sep 20: #Rain in #Mumbai #Kolkata #Bhopal #Goa #MumbaiRains @RidlrMUM @MumbaiTraffic pic.twitter.com/u30Y8HqhOJ
— Skymet (@SkymetWeather) September 19, 2017