अॅडलेड। ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात सर्वबाद 250 धावांवर राहिला. यामध्ये चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची 123 धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंंख्या उभारण्यास मदत केली.
पुजाराच्या या शतकी खेळीमुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच संघसहकाऱ्यांनीही त्याची ही कसोटी मधील सर्वात सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले आहे.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय फलंदाज स्वस्तात बाद होत होते मात्र पुजाराने टिकून खेळ करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
पुजाराने आर अश्विनला साथीला घेत सातव्या विकेटसाठी 62 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. नंतरच्या फलंदाजांनीही त्याला योग्य साथ दिली. यावेळी पुजाराने संयमाने फलंदाजी करत नंतर मोठे शॉट्स खेळण्यास सुरूवात केली.
पुजाराच्या या सावधगिरी आणि जागृकतेबद्द्ल कोलकाता पोलिसने ट्विट करत नागरीकांना त्याच्याप्रमाणेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान केले आहे.
— Kolkata Police (@KolkataPolice) December 7, 2018
या सामन्यात आज(7 डिसेंबर) दुसऱ्या दिवसाखेर आॅस्ट्रेलिया संघाने 88 षटकात 7 बाद 191 धावा केल्या आहेत. यामध्ये ट्रेविस हेडने एकाकी झुंज देताना 149 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या असून तो दुसऱ्या दिवसाखेर नाबाद आहे. त्याच्या बरोबर मिशेल स्टार्क नाबाद 8 धावांवर खेळत आहे.
या डावात भारताकडून आर अश्विन(3/50), इशांत शर्मा(2/31) आणि जसप्रीत बुमराह(2/34) यांनी विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–त्या एका विजयाने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल
–जगातील कोणत्याही संघावर येऊ नये ती वेळ आज पाकिस्तानवर आली
–आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत