भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. याआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात कसोटी सामने खेळवले जात आहेत. ज्यामध्ये भारत अ संघाला दौऱ्याच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाने खेळाच्या चौथ्या दिवशी हा सामना जिंकला आणि भारत अ संघाचा 7 विकेट राखून पराभव केला. भारत अ संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे आहे. 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात भारत अ संघातील काही खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचा कर्णधार नॅथन मॅकस्विनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारत अ संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पहिल्या डावात संघ 107 धावांवर ऑलआऊट झाला. ज्यामध्ये देवदत्त पडिक्कलने भारताकडून सर्वाधिक 36 धावांची खेळी खेळली. तर दुसऱ्या डावात यजमान संघ 195 धावा करून सर्वबाद झाला. या डावात भारत अ संघाकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करत 18.4 षटकात 46 धावा देत 6 बळी घेतले. याशिवाय प्रसिध कृष्णानेही या डावात तीन विकेट घेतल्या.
टीम इंडिया पुन्हा आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरली. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू ईश्वरन काही खास करू शकले नाहीत आणि 30 धावांवर टीम इंडियाने दोन विकेट गमावल्या. यानंतर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी टीम इंडियाचा डाव सांभाळला आणि दोन्ही फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी 196 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारत अ संघ चांगल्या स्थितीत पोहोचू शकला.
मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य कोणत्याही खेळाडूने डाव सांभाळला नाही आणि भारत अ संघ 312 धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात साई सुदर्शनने 103 धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलने 88 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी 225 धावांचे लक्ष्य दिले. ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलिया अ संघाने केवळ 3 विकेट्स गमावून केला.
Captain and Test hopeful Nathan McSweeney (88*) & Beau Webster (61*) steered the chase this morning without a hiccup 👍
Scorecard: https://t.co/KuEY8CmJYp | #AUSAvINDA pic.twitter.com/bfNU5HfRTa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 3, 2024
हेही वाचा-
IND VS NZ; न्यूझीलंडसाठी आनंदाची बातमी! भारतासाठी विजयाचा मार्ग खडतर!
IND VS NZ; रवींद्र जडेजाची कमाल, WTC मध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय
फक्त 37वा सामना… पंतने मोडला धोनीचा कसोटी विक्रम, गिलख्रिस्टचा विश्वविक्रमही धोक्यात!