अॅडलेड। ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 250 धावा करत सर्व विकेट्स गमावल्या. यामध्ये चेतेश्वर पुजाराने 123 धावांचा सर्वोत्तम खेळी केली.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आल्यावर भारताचे फलंदाज झटपट बाद झाले. यामध्ये सलामीवीर केएल राहुल (2) आणि मुरली विजय हे स्वस्तात बाद झाल्यावर भारताच्या फलंदाजीला सुरूंग लागला.
सलामीवीर दोनच धावा करून बाद झाल्याने भारतीय माजी दिग्गज सुनिल गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल जर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला तर त्याला संघातून काढावे, असे परखड मत त्यांनी मांडले आहे.
केएल राहुल 2 धावा केल्यावर जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर एरॉन फिंचला झेल देत बाद झाला.
“राहुलने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली नाही तर त्याला अंतिम अकरामधून काढण्यात यावे. पहिल्या डावात त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. तो चांगले शॉट्स खेळत नव्हता”, असे गावसकर म्हणाले.
“जेव्हा तुम्हाला माहित आहे की ऑफ स्टम्पला शॉट खेळल्यावर तो स्लिपमध्ये जाऊन तुम्ही बाद होऊ शकता. मग त्या चुका तुम्ही करताच का? राहुलने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही अशाच चुका केल्या होत्या. त्या सुधारण्याचा प्रयत्नही त्याने केला नाही.” असेही गावसकर पुढे म्हणाले
राहुलला ऑस्ट्रेलिया एकादश विरुद्धही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तेव्हाही तो 3 धावावर बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–गौतम गंभीरची कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात ‘नाद’ खेळी
–आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत
–आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम