मेलबर्न। ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिशेल जॉन्सन मागील काही दिवसांपासून भारताचा कर्णधार विराट कोहलीवर केलेल्या टीकेमुळे चांगलाच चर्चेत आहे. तसेच विराटवर टीका केल्यामुळे विराटचे चाहतेही त्याच्यावर नाराज आहेत.
त्यातच बुधवारी(26 डिसेंबर) विराटने जर मेलबर्नच्या खेळपट्टीवर शतक केले नाही तर त्याने निवृत्ती घ्यावी असे एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्विट केले आहे.
झाले असे की जॉन्सनने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या खेळपट्टीवर टिका करण्यासाठी एका रिकाम्या रस्त्याचा फोटो टाकाला आहे. त्याच्या या पोस्टवर एका ट्विटर यूजरने ट्विट केले आहे की ‘विराट शतक करणार आहे हे समजल्याने तू कारणे देत आहेस.’
https://twitter.com/MitchJohnson398/status/1077785132038115328
So you're giving excuses as you came to know that virat will score 100+ 😂😂😂😂
— vishnu vardhan reddy (@reddyvishnu66) December 26, 2018
त्यावर उत्तर देताना जॉन्सन गमतीने म्हणाला, ‘कारणे नाही. मी खेळत नाही. पण जर विराटने या खेळपट्टीवर शतक केले नाही, तर त्याने निवृत्ती घ्यावी.’
https://twitter.com/MitchJohnson398/status/1077789535822503936
त्यानंतर पुन्हा दुसऱ्या चाहत्याने जॉन्सनला 2014 मध्ये विराटने मेलबर्नवर केलेल्या 169 धावांची आठवण करुन दिली आहे. पण यावर जॉन्सनने उत्तर दिली की, ‘हो तो खूप चांगला खेळला होता. पण दुर्दैवाने त्याला अनेकदा जीवदान मिळाले. ती खूप चांगली मालिका होती.’
https://twitter.com/Shritam007/status/1077796690269097984
https://twitter.com/MitchJohnson398/status/1077800239984082945
जॉन्सनचे असे संभाषण फक्त यावरच थांबले नाही. पुढे एका चाहत्याने त्याला ट्विट केले आहे की, ‘तूझ्यापेक्षा जास्त विराटला कोणी ओळखत नाही, असे मला वाटते. जर त्याने तूझ्याविरुद्ध शतक केले असते तर तू त्याला बोलू शकतो. मागच्यावेळेपेक्षा सध्याचे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण चांगले नाही. त्यामुळे मागे राहुन मजा घे आणि विराटला त्याच्या बॅटने बोलू दे मित्रा.’
I think nobody knows virat better than you mitch. if he scored 100 @MCG against you, then u can count on him this time, current aussie attach is no good unlike last time.
Sit back and enjoy the bat talk of virat mate. cheers 😎— Farhan (@farhanalready) December 26, 2018
या ट्विटलाही जॉन्सनने उत्तर दिले आहे. तो म्हणला, ‘तूला असे म्हणायचे आहे का, की बॅट आणि तोंडाने त्याला बोलू दे?’
https://twitter.com/MitchJohnson398/status/1077837737724502017
पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलिया कर्णधार टिम पेन आणि विराट यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे जॉन्सनने विराटवर ही टिका केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट 82 धावा करुन बाद झाला आहे. तर चेतेश्वर पुजाराने 106 धावांची शतकी खेळी केली आहे. तसेच मयंक अगरवालने 76 आणि रोहित शर्माने नाबाद 63 धावांची खेळी केली आहे. या जोरावर भारताने पहिल्या डावात 7 बाद 443 धावसंख्येवर डाव घोषित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–त्या गोलंदाजाच नाव जरी घेतलं तरी कोहली, पुजारा आणि रहाणे येतात टेन्शनमध्ये
–Video: हिटमॅन रोहित शर्माने ती गोष्ट केली तर ऑस्ट्रेलियन कर्णधार होणार मुंबई इंडीयन्सचा सपोर्टर
–तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर