सध्या बॉर्डर-गावसकर मालिका कसोटी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने संपन्न झाले आहेत. मात्र मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन शुक्रवार (15 जानेवारी) पासून खेळला जाईल. तत्पूर्वी तिसरा कसोटी सामना बर्याच कारणांनी चर्चेत राहिला. त्यापैकी एक कारण हे स्टीव्ह स्मिथचा व्हिडिओ होते. ज्यावर अजून चर्चा सुरू आहे. आता तर या व्हिडिओवरुन मार्क वॉ आणि मायकेल वॉन हे दोघे सोशल मीडियावर भिडले आहेत.
सिडनी येथे सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा सामना पार पडला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीवर छेडछाड करताना दिसत होता. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर स्मिथवर टीका केली जात आहे आणि हा वाद अजून थांबला नाही. स्टीव्ह स्मिथने भारतीय खेळाडू रिषभ पंतने फलंदाजी करण्यासाठी जे मार्क केले होते, ते पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याचा हा व्हिडिओ चर्चेत आहे.
या व्हिडिओबद्दल स्टीव्ह स्मिथने स्पष्टीकरण दिले आहे, तो म्हणाला की त्याने या गोष्टी फक्त समजण्यासाठी आणि सरावासाठी केल्या होत्या. त्याच गोष्टीवरून इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन आणि ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज खेळाडू मार्क वॉ हे दोघे या प्रकरणावरून सोशल मीडियावर भिडले आहेत.
मायकेल वॉनने इंस्टाग्रामवर आयसीसीच्या नियमाचे स्क्रिनशॉट शेअर करताना लिहिले, “स्टीव्ह स्मिथच्या या हरकतीमुळे एका मोठ्या वादाला जन्म दिला आहे. मी त्याच्याकडून करण्यात आलेल्या या गोष्टीला वेडेपणाची हरकत समजतो. परंतु याला चिटींग म्हणता येणार नाही. माझे म्हणणे आहे की, मी आणि तुम्ही काय विचारता करता यापेक्षा आयसीसीचे नियम महत्त्वाचे आहेत. जे खेळ व्यवस्थित पार पाडण्याचे काम करतात.”
मायकेल वॉनच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मार्क वॉने लिहले की, “मला वाटते मायकेल वॉन हे आपले मानसिक संतुलन गमावून बसले आहेत. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये कसे कोणी जाणूनबुजून येवढा वेळ वाया घालवू शकतो. मी याबद्दल चिंतेत आहे.” यावर प्रत्युत्तर देताना मायकेल वॉनने लिहिले, “मला वाटते ज्युनियरला वाचताना अडचण येत आहे. मी स्पष्ट लिहिले आहे की, वेडेपणाची हरकत होती ना की धूर्तपणा, परंतु नियम सर्वांना सारखेच आहेत. त्यामुळे स्मिथ पुढेही असेच करतो का, हे बघावे लागेल.”
महत्वाच्या बातम्या:
म्हणून चौथ्या कसोटीसाठीच्या भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा उद्याच होणार!
स्लेजिंग प्रकरणात कोच लँगर यांनी केली पेनची पाठराखण; म्हणाले, तो एक मेहनती खेळाडूच तर आहेच, पण
गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान






