पर्थमध्ये भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला धमाकेदार सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पर्थमध्ये जे घडले ते ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना निराशा करणारे आहे. प्रथम भारताने ऑस्ट्रेलियन संघानो पहिल्या डावात 104 धावांत गुंडाळला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली. दुसरीकडे, खेळपट्टीचा रंग पूर्णपणे बदललेला दिसून आला. पहिल्या दिवशी खेळपट्टीचा रंग हिरवा होता, मात्र दुसऱ्या दिवशी तो थोडा लाल झाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळपट्टीचा रंग निस्तेज झाला. मात्र, अजूनही खेळपट्टीवर गवत आहे. अशा परिस्थितीत इथे सुरक्षित स्कोअर काय असेल? हे फार महत्वाचे आहे.
पर्थ कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरूच आहे. या बातमी आखेरपर्यंत भारताने 2 विकेट गमावून 306 धावा केल्या आहेत. भारताकडे 354 धावांची आघाडी आहे. पण अजूनही खेळाचे 8 सत्र बाकी आहेत. खेळाचे पूर्ण दोन दिवस शिल्लक आहेत आणि आजची दोन सत्रे बाकी आहेत. अशा स्थितीत या सामन्यात टीम इंडियाची सुरक्षित धावसंख्या किती असेल? हा एक मोठा प्रश्न पडला आहे. कारण भारतीय फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. ते पाहता खेळपट्टी सपाट आहे आणि येथे धावा करता येतील. असे वाटते. अशा स्थितीत भारतीय संघाला डाव घोषित करण्याची घाई होणार नाही. कारण ऑस्ट्रेलियन संघही धावा करू शकतो.
या सामन्यात टीम इंडियासाठी सुरक्षित धावसंख्या काय असू शकते याबद्दल बोलायचे झाल्यास, तर भारताला किमान 500+ विचार करावा लागेल. असे दिसायला मिळते. आज जर भारत दिवसभर खेळण्यात यशस्वी झाला तर ऑस्ट्रेलियाला दोन दिवस फलंदाजीसाठी बोलावू शकेल. जर भारताला चौथ्या दिवशी म्हणजे उद्या पहिले सत्र खेळायचे असेल, तर त्यापासून एकही पाऊल मागे पडणार नाही. चौथ्या आणि पाचव्या दिवशी फलंदाजी करणे कठीण होईल. भारताला 10 विकेट्स घ्याव्या लागतील आणि यात भारताला यशही मिळू शकते. आज दुसऱ्या सत्रात भारताने आणखी 100 धावा जोडल्या तर मधल्या फळीतील फलंदाज आक्रमक क्रिकेट खेळून आज 500 हून अधिक धावा सहज करू शकतात.
हेही वाचा-
IND VS AUS; केएल राहुल-यशस्वी जयस्वालचा डंका! ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वोच्च सलामी भागिदारी
IND vs AUS: यशस्वी जयस्वालचे ऐतिहासिक शतक, 47 वर्षांनंतर भारतीयाद्वारे ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी
IPL 2025 Mega auction; सर्वात आधी या खेळाडूंवर लागणार बोली, या ठिकाणी पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग