---Advertisement---

कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी

On: रविवार, डिसेंबर 2, 2018 9:00 AM
---Advertisement---

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी आजी-माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे.

आॅस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पॉटिंगनेही यात उडी घेतली आहे. त्याने या मालिकेपूर्वी मालिकेच्या विजयी संघाची आणि सर्वोच्च धावा करणाऱ्या फलंदाजाची भविष्यवाणीही केली आहे.

तो म्हणाला आहे की या मालिकेत आॅस्ट्रेलिया भारताला 2-1 अशा फरकाने पराभूत करेल. तसेच आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा या मालिकेत सर्वोच्च धावा करेल.

याबद्दल बोलताना पॉटिंग म्हणाला, ‘ख्वाजा कोहलीला मागे टाकेल. नक्कीच मला खात्री आहे,  कोहलीही या मालिकेत चांगला खेळेल. कारण तो जिथेही खेळतो तिथे चांगले खेळतो. मागील आॅस्ट्रेलिया दौऱ्यातही तो उत्तम खेळला होता.’

त्याचबरोबर पॉटिंग म्हणाला, जर अॅडलेड आणि पर्थवर गोलंदाजांना मदत मिळाली तर मेलबर्न आणि सिडनीपेक्षा तिथे विराटला धावा करणे कठीण जाईल.

तसेच ख्वाजाबद्दल बोलताना पॉटिंग म्हणाला ‘तो सध्या त्याच्या खेळाच्या शिखरावर आहे. त्याची आॅस्ट्रेलियामध्ये अफलातून कामगिरी झाली आहे. मला वाटते भारताचे वेगवान गोलंदाज त्याच्यासाठी अडथळा निर्माण करु शकतात. पण तो त्याच्या खेळाने यावर मात करेल.’

‘मला वाटते तो या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल आणि मालिकावीराचीही मानकरी ठरेल’

‘सध्या तो खूप चांगल्या लयीत आहे. निवड समीती सदस्य संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यात त्याच्या पाठीशी होते. त्यांनी त्याला संधीही दिली आणि त्यानेही त्याचा फायदाही घेत चांगली कामगिरी केली.’

‘त्याच्याकडे असलेले कौशल्य आणि पहिल्यापेक्षा आत्ता त्याचा त्याच्या खेळावर असणारा विश्वास फायदेशीर ठरेल. त्याच्यासाठी ही चांगली मालिका ठरेल.’

तसेच पॉटिंगने ग्राउंडस्टाफलाही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी बनवण्याची विनंती केली आहे.

याबद्दल पॉटिंग म्हणाला, ‘मला गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी पहायला आवडेल. कारण मला वाटते की भारताचे फलंदाज आमच्या गोलंदाजांचा जसा सामना करतील त्यापेक्षा आमचे फलंदाज भारताच्या गोलंदाजांचा चांगला सामना करतील.’

‘मागील 40 वर्षांच्या इतिहासात जेव्हाही भारत आॅस्ट्रेलियात आला आहे तेव्हा त्यांना जिंकता आलेले नाही. कारण वेगवान आणि उसळती खेळपट्टी. त्यामुळे मला अशी खेळपट्टी आवडेल.’

त्याचबरोबर पॉटिंग असेही म्हणाला की पहिल्या दोन सामन्यात खेळपट्टीवर गवत ठेवले तर त्यानंतर आॅस्ट्रेलिया मालिकेत वर्चस्व निर्माण करु शकेल.

तसेच पॉटिंगने आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या क्षमतेवरही विश्वास व्यक्त करताना तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल असे म्हटले आहे.

याबरोबरच दोन्ही संघाकडे चांगले वेगवान गोलंदाज असल्याने फलंदाजीवर बरचं काही अवलंबून असेल, असेही मत 168 कसोटी सामने खेळलेल्या पॉटिंगने व्यक्त केले आहे.

आॅस्ट्रेलियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेला पॉटिंग पुढे म्हणाला, ‘भारताला मालिकेची चांगली सुरुवात करावी लागेल. जर ते पहिल्या दोन सामन्यात मागे पडले तरी ते सिडनी किंवा मेलबर्न कसोटीत पुनरागमन करु शकतात. पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल.’

भारताने याआधी 2014 मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. या मालिकेत भारताला 2-0 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण भारताकडून विराट कोहलीने चांगली कामगिरी केली होती. त्याने त्या मालिकेत 8 डावात 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या होत्या. त्या मालिकेतील या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

दुखापतीनंतर पृथ्वी शॉ जास्त बोलतही नाही, अश्विनने दिली माहिती

हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव

८ वर्षांनी टीम इंडिया जिंकणार विश्वचषक, जाणून घ्या काय आहे कारण

अष्टपैलू खेळाडू म्हणतो, विराटने सांगितले तर ओपनिंगही करेल

२१२ वन-डे खेळलेला खेळाडू म्हणतो, कसोटी नकोच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment