भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील काही दिवसांमध्ये अनेक धक्कादायक विधाने करुन गोंधळ निर्माण केला होता.
सोमवारी (7 जानेवारी ) भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला ऐतिहासिक विजयाची तुलना त्यांनी 1983च्या विश्वचषक आणि 1985च्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या विजयाशी करत आजचा विजय या दोन्ही विजयापेक्षा मोठा आहे असे म्हणत पुन्हा एकदा धाडसी विधान केले आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सोमवारी(7 जानेवारी) पाचव्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
“1983 चा विश्वचषक आणि 1985चा वर्ल्ड चॅम्पियनशीप हे दोन्ही विजय मोठे होते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये मिळवलेला आजचा विजय त्याहीपेक्षा मोठा आहे. कारण कसोटी क्रिकेट हे खूप कठीण असते”, असे शास्त्री यांनी ट्विट करत हे चमत्कारीक विधान केले आहे.
कसोटी क्रिकेट आणि वन-डे क्रिकेट यांची तुलना जरी होत नसली तरी 1983 च्या विश्वचषकात विंडीज सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवणे काही सोपे नव्हते.
“कसोटीमध्ये विराट सारखा कोणीही खेळू शकत नाही. तो एक सर्वोत्तम कर्णधार आहे”, असे म्हणत शास्त्री यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीवरही कौतुकांचा वर्षाव केला आहे.
1983 – was big
1985 – was big
2019 – is as big if not the biggest as it has come in the toughest format.
Salute you Virat and boys for making this happen 🙏🇮🇳 #AusvInd pic.twitter.com/m6DoqgdYeL— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 7, 2019
आत्तापर्यंत 71 वर्षांत आशिया खंडातील संघांनी 31 कसोटी मालिका आणि 98 कसोटी सामने ऑस्ट्रेलियामध्ये खेळले आहेत. तसेच 29 आशियाई कर्णधारही ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील फक्त विराट कोहलीला भारताचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–७१ वर्ष, ३१ मालिका, ९८ सामने, २७२ खेळाडू, २९ कर्णधार…तरीही कोहली पहिलाच
–युवराज सिंगला टीम इंडियात परतण्याचा मार्ग सापडला
–त्या देशात टीम इंडिया कधीही जिंकली नाही कसोटी मालिका