मुंबई | भारतीय संघाचा २०१८-१९ हंगामातील परदेश दौरा काल न्यूझीलंड विरुद्ध १-२ अशा पराभवाने संपला. हा हंगामातील परदेश दौरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने जानेवारी २०१८मध्ये सुरु झाला होता.
आता ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत असून टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ टी२० आणि ५ वनडे सामने खेळणार आहे.
२४ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाबरोबर हे २ टी२० सामने खेळणार आहे. पहिला सामना विशाखापट्टनम तर दुसरा सामना बेंगलोरला होणार आहे.
त्यानंतर 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
या मालिकेतील वनडे मालिकेत प्रभारी कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्याची दाट शक्यता आहे. तर कर्णधार विराट कोहली पुन्हा संघाबरोबर दिसू शकतो.
तसेच याच मालिकेतून अजिंक्य रहाणे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. त्याबरोबर केएल राहुलचाही संघात विचार होऊ शकतो.
विराट कोहलीला यापुर्वीच विश्रांती दिल्यामुळे तो या मालिकेत खेळणे जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेची वनडे संघात ‘वापसी’ जवळपास पक्की असल्याचे बोलले जात आहे.
दिनेश कार्तिक- रिषभ पंतमध्ये स्पर्धा-
माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर विश्वचषक २०१९मध्ये राखीव यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतपैकी एका नावाचा विचार होऊ शकतो. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापैकी कोण चांगली कामगिरी होते यावर त्याची २०१९विश्वचषकातील निवड जवळपास निश्चित आहे.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा –
टी20 मालिका –
पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – बंगळूरु – वेळ: संध्या. 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता
चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
महत्त्वाच्या बातम्या-
–अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली
–मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने
–असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ
–हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?
–भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके
–आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच
–…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा