भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे. चार सामन्यांच्या या बहुप्रतिक्षित मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव झाला. सामन्यात पहिले दोन दिवस आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी अवघ्या 36 धावांवर बाद केले. भारताच्या या कामगिरीवर सर्व बाजूने टीका होत आहे. सलामीवीर मयंक अगरवाल व पृथ्वी शॉची खराब कामगिरी भारताच्या पराभवाचे मुख्य कारण मानले जात आहे. अशा परिस्थितीत भारताला उत्तम सलामी देण्यासाठी सर्वजण रोहितकडून अपेक्षा करत आहेत. रोहित सध्या ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात एका 2BHK फ्लॅट मध्ये आपला १४ दिवसांचा काॅरंटाईन कालावधी घालवत आहे.
कॉरंटाईनमध्ये राहावं लागणार १४ दिवस
रोहित सध्या सिडनी येथे एका हॉटेलमधील खोलीत 14 दिवसांचा काॅरंटाईन कालावधी घालत आहे. विशेष बाब म्हणजे रोहितला या खोलीतून बाहेर पडण्याची परवानगी नाही. रोहितला कुठलाही प्रकारचा सराव करण्याची देखील परवानगी नाही. रोहित १४ दिवसांचा काॅरंटाईन कालावधी संपल्यानंतर शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात समाविष्ट होऊ शकतो. या १४ दिवसात रोहितला आपल्या फिटनेस सोबतच मानसिक स्वास्थ्याची देखील काळजी घेणे गरजेचे असेल.
रोहितची संघाला गरज
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माची सध्या संघाला गरज आहे. पालकत्व रजा घेऊन विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर भारतात परतणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत रोहितला भारताची खिंड लढवावी लागेल. रोहितने आतापर्यंत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. कसोटी चॅम्पियनशीपमध्ये रोहितचे ३ शतक देखील आहेत. याच कामगिरीची पुनरावृत्ती तो ऑस्ट्रेलियामध्ये करेल अशी सर्वांना खात्री आहे.
भारताचे मालिकेतील पुनरागमन अवघड
पहिला कसोटी सामना गमावल्यामुळे भारतीय संघ सध्या प्रचंड दबावात आहे. पहिल्या सामन्यात सुरुवातीचे दोन दिवस भारतीय संघ आघाडीवर होता, मात्र तिसऱ्या दिवशी पूर्ण संघ 36 धावांवर सर्व बाद झाल्याने भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणेवर भारतीय संघाची जबाबदारी असणार आहे. मालिकेत पुनरागमन करण्यासाठी भारताला मेलबर्न येथे 26 तारखेपासून होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. २०१८-१९ साली झालेल्या मालिकेत भारताने मेलबर्न येथील कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी अजिंक्य सेनेकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाला पोलिस छाप्यानंतर मुंबईत अटक
‘ …तर भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो’, गावसकरांचा इशारा
भल्या भल्यांना न जमणाऱ्या स्टाईलने करतो ‘हा’ खेळाडू फलंदाजी; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित