भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये 146 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला. हा पराभव माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
यावेळी त्यांनी भारतीय निवड समिती सदस्यांदा या पराभवाचा जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही त्यांचे पद कायम ठेवायचे असेल तर पुढील दोन सामन्यात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.
“भारत पुढील दोन कसोटी सामन्यात पराभूत झाला तर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल”, असे गावसकर म्हणाले.
यावर्षात भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यात पराभूत व्हावे लागले होते.
“दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून आपण बघत आलो आहोत की संघनिवड करताना किती चुका झाल्या आहेत. त्यामुळे संघाला अनेक सामनेही गमवावे लागले आहेत. संघ जर नीट निवडला असता तर भारताने सामने जिंकले असते”, असे गावसकर म्हणाले.
“पुढच्या दोन सामन्यासाठी संघ निवडताना नीट विचार करावा. ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघेही नसूनही ते चांगली कामगिरी करत आहे. आपण कुठे चूक करत आहोत हे पण बघावे. जेणेकरून आपण त्याच चुका परत करणार नाही”, असेही गावसकरांनी सुचविले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पुढील सामना 26 डिसेंबरला होणार आहेत. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्ऩ आता खेळणार विराटच्याच संघात…
–मुंबईसाठी युवराज सिंगवरची बोली ठरली सर्वात मौल्यवान!
–लियोनल मेस्सीने पटकावला पाचवा ‘गोल्डन बूट’