ऑस्ट्रलिया विरुद्ध भारत यांच्यामधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना येत्या 6 डिसेंबरला अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला एक विशेष सल्ला दिला आहे.
ऑ्स्ट्रेलिया संघ हा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत फलंदाजीत कमकुवत बनला आहे. यामुळे भारतीय संघाला ही मालिका जिंकणे शक्य आहे. पण गोलंदाजीत ऑस्ट्रेलियन उत्कृष्ठ असून ती बाब न स्विकारणे महागात पडू शकते. यामुळे सचिनने भारताला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
“स्मिथ आणि वॉर्नरच्या अनुपस्थिती लक्षात घेता भारतीय फलंदाजांना मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे भारी पडू शकतात. तसेच पहिल्या तीन खेळाडूंनी 40 षटकात विकेट गमावण्याचे टाळावे”, असे सचिन म्हणाला.
“जेव्हा ऑस्ट्रेलिया सारख्या देशाच्या दौऱ्यावर जाता तेव्हा सलामीची फलंदाजी महत्त्वाची ठरते. या ठिकाणी पहिले तीन विकेट लवकर जाण्याची शक्यता असते. तर चौथी विकेटही लवकर पडू शकते. अशात पहिल्या तीन खेळाडूंनी सावधतेने फलंदाजी करणे योग्य”, असेही तो पुढे म्हणाला.
“ऑस्ट्रेलियामध्ये चेंडू नवीन असल्याने पहिली 30-35 षटके त्रायदायक ठरू शकतात. मात्र नंतर खेळणे थोडे सोपे जाऊ शकते.”
“दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने चांगली फलंदाजी केली. पण संघात कोणाला घेतील याबाबत मी सांगू शकत नाही”, असे सचिनने रोहित शर्माला संघात घेण्याबद्दल आपले मत मांडले.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान
–भारतीय फलंदाजांसाठी आॅस्ट्रेलियाचा हा गोलंदाज ठरू शकतो मोठा धोका