भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील 2 सामने खेळले गेले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1ने दोन्ही संघाने बरोबरी केली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. दोन्ही संघाचा हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा इरादा असणार आहे. सिडनीत जेव्हा कसोटी खेळण्यात त्यावेळी या मैदानावर सचिन तेंडुलकरने ठोकलेल्या द्विशतकाची आठवण अनेकांना होते.
सन 2004 ला जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाचे स्टीव वाॅ आपला शेवटचा कसोटी सामना खेळत होते, तेव्हा सचिन तेंडुलकरने दमदार फलंदाजी करताना 241 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला स्टीव वाॅ खेळत असलेला शेवटचा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे ही कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. या शानदार शतका मागची मजेदार कहाणी सचिन तेंडुलकरनी सांगितली आहे.
सचिन तेंडुलकर आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “मी सिडनी कसोटी 241 धावा केल्या होत्या. त्या पाच दिवसांमध्ये मी फक्त ब्रायन ऍडम्सचे समर ऑफ 69 हे गाणे ऐकले होते. मैदान, ड्रेसिंग रूम, लंच टाईम, टी ब्रेक, हॉटेलमध्ये माघारी येताना किंवा फलंदाजीसाठी जायचे असो, पाच दिवस हेच गाणे ऐकले होते.”
दोनवेळा खाते सुद्धा उघडता आले नव्हते सचिन तेंडुलकरला
या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे खेळला गेला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता. ऍडलेडमध्ये दुसर्या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. मेलबर्न येथे खेळण्यात आलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट्सने विजय मिळवला होता.
चौथा कसोटी सामना सिडनीत खेळला गेला होता जो अनिर्णीत राहिला होता. ब्रिस्बेन सामन्यात तेंडुलकर शून्यावर बाद झाला होता. ऍडलेडमध्ये सचिन तेंडुलकरने 1 आणि 37 धावा केल्या होत्या. मेलबर्न येथे 0 आणि 44 धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या तीन कसोटी सामन्यात तेंडुलकर अपयशी ठरला होता. त्यानंतर त्यानी चौथ्या सामन्यात दमदार खेळी करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर स्टीव वाॅ यांचे शेवटचा सामना जिंकण्याचे स्वप्न भंगले.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने निवडला दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ, केवळ ‘या’ एका भारतीयाला दिले स्थान
‘डेल स्टेन’ने आयपीएलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय! नववर्षाच्या सुरुवातीलाच आरसीबीच्या चाहत्यांना धक्का
“सिराजप्रमाणे नटराजनही कसोटी पदार्पण सामन्यात चमकेल”, ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून कौतुकाची थाप