---Advertisement---

‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका

On: रविवार, डिसेंबर 13, 2020 8:29 AM
---Advertisement---

खेळ कुठलाही असो, तिथे चाहत्यांनी खेळाडूंबद्दल वाईट कमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र, खेळाडूही कधी कधी त्या कमेंटवर प्रतिक्रिया देत चाहत्यांचे तोंड बंद करत असतात. असेच काहीसे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनसोबतही झाले. त्याने चाहत्याचा चांगलाच समाचार घेतला.

धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. त्यामुळे तो भारतात परतला आहे. यादरम्यान त्याने शनिवारी (१२ डिसेंबर) आपले संघसहकारी दीपक चाहर आणि युझवेंद्र चहल यांच्यासह विमानातील एक फोटो मजेशीर कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला. त्याने फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘डोळे काढून गोट्या खेळतो गोट्या.’ यानंतर एका चाहत्याने धवनला ट्रोल केले.

https://www.instagram.com/p/CIqqQW2DlA2/?utm_source=ig_web_copy_link

त्यानंतर ‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा धवनही शांत बसणार नव्हता. त्याने ट्रोल करणाऱ्या एका चाहत्याला चांगलेच फटकारले. धवनने त्याला प्रत्युत्तर देत म्हटले की, “तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल हेच म्हणत होते.”

धवनने ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. वनडेमध्ये ३ सामने खेळताना त्याने ४० च्या सरासरीने १२० धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ३ सामने खेळताना २७ च्या सरासरीने ८१ धावा केल्या होत्या.

तो टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत २०११-२० यादरम्यान खेळताना ६४ सामन्यांत २८.२८ च्या सरासरीने १६६९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ११ अर्धशतके ठोकली आहेत. टी२०त सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वलस्थानी विराट कोहली (२९२८) आणि दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (२७७३) आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील सामना खेळू नये”, आकाश चोप्राने सांगितले कारण

“भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज”, कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वक्तव्य

“केएल राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसे खर्च करण्यासही तयार”, विंडीजच्या दिग्गजाने केली स्तुती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---